ETV Bharat / city

Devendra Bhuyara's opinion : व्यक्ती दोषी असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी - आ.देवेंद्र भुयार - नुपूर शर्मा

अमरावती शहरातील (Amravati City) औषध विक्रेते उमेश कोल्हे प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इरफान शेख रहीम (Sheikh Irfan Sheikh Iqbal) याचा मोर्शी येथे आयोजित ईद मिलन सोहळ्यात आ.देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्या हस्ते सत्कार झाला होता. त्याची संघटना विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असल्याचे देखील समोर आले आहे.

Sheikh Irfan Sheikh Iqbal
शेख रहीम शेख इकबाल
author img

By

Published : Jul 5, 2022, 2:35 PM IST

अमरावती- उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असणारा अमरावती शहरातील (Amravati City) रहिवासी शेख रहीम शेख इरफान (Sheikh Irfan Sheikh Iqbal) याची रहेबर संघटना प्रकाश झोतात आली आहे. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनात पोस्ट शेअर करणाऱ्या अमरावती शहरातील अनेक व्यक्तींना रहेबर हेल्पलाइन या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने धमकावण्यात आल्याचे उघड झाले आहे. संघटनेच्या वतीने शहरात आयोजित विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत पाणी वितरण, सरबत वाटप,आदी उपक्रम राबविण्यात आले . कोरोना काळात देखील या संघटनेच्या वतीने अन्न वाटप करण्यात आले होते. या संघटने कडे रुग्णवाहिका देखील आहे.

राहेबर संघटनेवर कोणाचा सपोर्ट : अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी रविवार हेल्पलाइन ही संघटना कार्यरत असून नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर करणाऱ्या उमेश कोल्हे यांच्या हस्ते प्रकरणात या संघटनेचा मुख्य कार्यकर्ता प्रमुख आरोपी असल्याचे सिद्ध झाले असतानाच नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट करणाऱ्यांना धमकी देणारे सुद्धा याच रहेबर हेल्पलाइनचे सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय मंडळींसोबत जवळीक असणाऱ्या रबर संघटनेला नेमका कोणाचा सपोर्ट आहे याचा शोध आता अमरावती पोलीस घेत आहेत.

दोशीला कठोर शिक्षा व्हावी - आ. भुयार : आमदार या नात्याने मला अनेक जण भेटत असतात मोर्शी येथे ईद मिलन सोहळ्यात अनेक लोकांप्रमाणेच शेख इरफान शेख रहीम याचा देखील माझ्या हस्ते सत्कार झाला असेल. अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोण व्यक्ती काय करतो हे माहिती नसते. या प्रकरणात हा व्यक्ती दोषी असेल तर त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रीया आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

हेही वाचा :Umesh Kolhe Murder Case : एनआयए पथकासह अमरावती पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी

etv play button

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.