अमरावती : जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून दररोज हजारहून जास्त कोरोनाग्रस्त आढळून येत असल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 15 मे पर्यत संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतीलच कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल पंपावर पेट्रोल दिले जाणार आहे. याच्या धास्तीने अमरावतीतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. नेहमीच्या तुलनेत आज लोकांनी जास्त पेट्रोल आपल्या वाहनात भरून घेतल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले.
मागील पंधरा एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची सूट देण्यात आली होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीच्या नावाखाली नागरिक प्रचंड गर्दी करत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यांत वैद्यकीय सेवा वगळता पूर्णपणे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. असाच निर्णय अमरावतीच्या जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
दूध, किराणा, भाजीपाला, मांस,घरपोच देण्याची मुभा
या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वास्तुची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असले तर मात्र जीवनावश्यक सेवामध्ये मोडला जाणारा किराणा, भाजीपाला, दूध,मास ,फळे हे घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे.