ETV Bharat / city

Amravati Flood Affected Villages : पुरामुळे राहण्यासह खाण्याचेही झाले वांदे; उपाशी असणाऱ्या कुटुंबाच्या मदतीला धावून आली संस्था - सावरखेड

अमरावती शहरापासून ( Amravati villages ) अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भातकुली तालुक्यातील सावरखेड या गावात तीन आणि चार जुलै रोजी मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे हाहकार उडाला. गावालगत वाहणाऱ्या पेढे नदीला पूर आला आणि गावाला जोडणाऱ्या नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा जगाशी संपर्क ( Amravati Flood Affected Villages ) तुटला. गावातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या 70 ते 80 घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले. यापैकी एकूण 50 घरातील धान्य, कपडे, किराणा असे सारेच काही वाहून गेले.

Amravati Flood Affected Villages
पुरामुळे राहण्यासह खाण्याचेही झाले वांदे
author img

By

Published : Jul 15, 2022, 4:07 PM IST

Updated : Jul 15, 2022, 4:19 PM IST

अमरावती - मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पेढे नदीचे पाणी थेट सावरखेड गावात शिरले. ( Amravati Flood Affected Villages ) नदीकाठी असणाऱ्या सुमारे 50 घर अक्षरशः पाण्यात बुडाल्यामुळे घरात होते नव्हते ते धान्य, किराणा, कपडे वाहून गेले. गावाला जोडणाऱ्या नदीवरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा अमरावती शहराशी असणारा संपर्कच तुटला. अशा परिस्थितीत गावात रेशनचे धान्य येणे देखील बंद झाले. अशा परिस्थितीत उपासमारी सहन करणाऱ्या या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अमरावती हॉटेल असोसिएशन पुढाकार घेतला. या एकूण 50 कुटुंबांना आठ दिवस जेवणाची चिंता राहणार नाही. इतके धान्य आणि किराणा साहित्य मदत स्वरूपात दिले. शासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसताना आठ दिवसाच्या जेवणाची सोय झाल्यामुळे या सर्व पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुरामुळे राहण्यासह खाण्याचेही झाले वांदे

पुरामुळे गावात हाहाकार - अमरावती शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भातकुली तालुक्यातील सावरखेड या गावात तीन आणि चार जुलै रोजी मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे हाहकार उडाला. गावालगत वाहणाऱ्या पेढे नदीला पूर आला आणि गावाला जोडणाऱ्या नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा जगाशी संपर्क ( Amravati Flood Affected Villages ) तुटला. गावातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या 70 ते 80 घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले. यापैकी एकूण 50 घरातील धान्य, कपडे, किराणा असे सारेच काही वाहून गेले. डोळ्यातील अश्रूंशिवाय या गरीब कुटुंबीयांकडे काही एक उरले नाही. गुरुपौर्णिमेसारख्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी देखील घरात खायला काहीही नव्हते. पुरामुळे अक्षरशः होत्याचे नव्हते झाल्यामुळे अख्ख्या सावरखेड गावात नैराश्य पसरले.

गावात सर्वत्र पाणीच पाणी - पेढी नदीला आलेल्या पुरामुळे सावरखेड गाव पूर्णतः पाण्याखाली आले. गावात सर्वत्र पाणीच पाणी शिरल्यामुळे कोणाला कोणाचीही मदत करता आली नाही. गावात असणाऱ्या एकमेव चक्कीतही पाणी शिरल्यामुळे ही चक्की आज देखील बंदच पडून आहे. आता पाणी ओसरले असले तरी गावात सर्वत्र चिखल माखला आहे.

गावाला जोडणारा रस्ता गेला वाहून - सावरखेड गावाला जोडणारा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला. पेढे नदीवरील पुलानाजी रस्ता वाहून गेल्याने या ठिकाणी मला मोठा खड्डा पडला. ग्रामस्थांनी ह्या खड्ड्यात कसेबसे दगड टाकल्यामुळे आता ह्या मार्गावरून केवळ पायी जाता येते. गावात मोठे वाहन देखील आता येऊ शकत नाही तसेच गावात अडकलेले चार चाकी वाहन बाहेर निघणे सध्या तरी अशक्य आहे.

हॉटेल असोसिएशनला ही करावी लागली कसरत - पुरामुळे सावरखेड गावातील उपाशी कुटुंबीयांना आठ दिवस पुरेल इतक्या अन्नसाठाची मदत करण्यासाठी सरसावलेल्या अमरावती हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी धान्य आणि किराणा घेऊन सावरखेड गावापर्यंत पोहोचले असताना त्यांचे वाहन गावात शिरू शकले नाही. यामुळे गावापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर वाहन उभे करावी लागली. गावातून असलेल्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आलेल्या ऑटो रिक्षामध्ये ठेवण्यासाठी हॉटेल असोसिएशनच्या वाहनातील किराणा धान्याच्या पिशव्या काढून दुसऱ्या बाजूला हातात उचलून पायी चालत नेण्यात आल्या. गावाला जोडणाऱ्या पुलावर पाणी साचले असल्यामुळे या पाण्यातूनच हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मोठी कसरत करत चालत यावे लागले.

2008 मध्ये देखील केली होती मदत - अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या भीषण पुरांपैकी 2008 मध्ये सावरखेड आणि लगतच्या गावांमध्ये आलेला पूर हा अतिशय भयंकर असा पूर होता. त्यावेळी गावातील उंच भागावर असणाऱ्या एडवोकेट श्रीकांत खोरगडे यांच्या भल्या मोठ्या वाड्यात ग्रामस्थांनी आश्रय घेतला होता. या गावाची लोकसंख्या साडेतीनशे इतकी आहे. हे सर्वच ग्रामस्थ 2008 मध्ये सलग आठवडाभर खोरगडे यांच्या वाड्यातच मुक्कामी होते. त्यावेळी देखील अमरावती हॉटेल असोसिएशनच्या वतीने पूरग्रस्त सावरखेड वासियांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी हे मदत कार्य अतिशय आव्हानात्मक होते. मात्र मोठ्या अडचणींचा सामना करून त्यावेळी गावात मदतीचा प्रयत्न केला असल्याची माहिती अमरावती हॉटेल असोसिएशनचे रवींद्र सलोजा आणि दिलीप पोपट यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. पाटबंधारे विभागाने केलेल्या चुकीचा फटका आमच्या गावकऱ्यांना भोगाव लागत आहे, असा रोष देखील श्रीकांत खोरगडे यांनी व्यक्त केला.

पूरग्रस्तांना मिळाला दिलासा - सावरखेड गावाला पुराचा तडाखा बसून आता पंधरा दिवस होत आले आहे. या गावात अद्यापही एकही अधिकारी भिरकला नाही. ज्यांच्या घरातील सारे काही वाहून गेले अशा कुटुंबियांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. अशा संकटकाळात पूरग्रस्त गरीब कुटुंबांना आठ दिवस पुरेल इतके धान्य आणि किराणा साहित्य मिळाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गावातील रेशनचे दुकान येणाऱ्या आठ दिवसात देखील उघडले नाही तर पुन्हा मदतीसाठी येऊ असे आश्वासन अमरावती हॉटेल असोसिएशनच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले आहे.

या कारणामुळे सावरखेड गावात पूर - सावरखेड हे गाव निम्नपेढी प्रकल्पाच्या अंशतः बाधित क्षेत्रात येते. पेढे नदीच्या अगदी काठावर वसलेल्या सावरखेड या गावात पूर संरक्षण भिंत उभारण्यात आली. मात्र गावातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाईप टाकण्यात आले नसल्यामुळे गत तीन चार वर्ष गावाला पुराचा फटका बसला. यावर्षी मात्र पाटबंधारे विभागाने सांडपाणी वाहून नेण्यासाठी संरक्षण भिंती लगत पाईप टाकले मात्र हे काम अर्धवट केले तसेच चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पूर संरक्षण भिंतीला मोठे खड्डे पडले असून नदीच्या पुराचे पाणी या खड्ड्यांमधून तसेच चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेल्या पाईपलाईन मधूनच गावात शिरत असून गावाच्या काठावर राहणाऱ्या ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान होत असल्याची माहिती ग्रामस्थ ऍड. श्रीकांत खोरगडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

बुडीत क्षेत्रातील घरांचे पुनर्वसन व्हावे - गावात नदीकाठी वसलेल्या घरांचे पुनर्वसन व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. बुडीत क्षेत्र बाहेर असणाऱ्या ग्रामस्थांच्या शेतीत येण्या जाण्यासाठी गत तीन वर्षांपासून मंजूर असणाऱ्या मार्गाच्या कामाला गती मिळावी अशी मागणी देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा - Shinde government : शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी धक्का; नामांतराच्या निर्णयाला दिली स्थगिती

Last Updated : Jul 15, 2022, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.