अमरावती - ज्ञानोपासनेद्वारा अध्यात्म मार्गावर वाटचाल करणारे संत अच्युत महाराज यांनी समाज क्रांतीचा इतिहास घडविणाऱ्या संतान प्रमाणेच समाजासमोर वास्तव स्थितीचे अवलोकन करून भक्तीच्या माध्यमातून जीवनात उपयुक्त तत्त्वज्ञान मांडले आहे. अमरावती शहरात साने गुरुजी मानव सेवा संघ ( Sane Guruji Manav Seva Sangh ) अंतर्गत हॉट हॉस्पिटल उभारले. अच्युत महाराजांचा प्रचंड मोठा अनुयायी ( followers of Achyut Maharaj ) वर्ग विदर्भात आहे. आज हृदय रुग्णालयच्या ( Heart Hospital ) माध्यमातून हृदय रुग्णांची सेवा हेच गुरुवंदन अशा स्वरूपाची भावना अमरावतीकरांनी व्यक्त केली आहे.
हार्ट हॉस्पिटल इमारत विस्तारीकरणाच्या शुभारंभ - अमरावती शहरातील मराठी मार्गावर संत अच्युत महाराज यांनी स्वतः एक ऑक्टोबर 1998 ला विजयादशमीच्या मुहूर्तावर हार्ट हॉस्पिटल उभारले. 27 हजार फूट स्क्वेअर जागेत उभारण्यात आलेल्या ह्या रुग्णालयाची विस्तारीकरण आता 70 हजार स्क्वेअर फुट जागेवर होत आहे. अमरावती शहरात सर्वात मोठी ही नऊ मजली इमारत असणार असून यासाठी केवळ इमारत बांधकामासाठी साडेबारा हजार कोटी रुपये लागणार आहे तर रुग्णालयातील इतर साहित्यांसाठी अतिरिक्त 12 कोटी रुपये लागणार असल्याची माहिती अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे विश्वस्त सुधीर दिवे 'ई टीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
हृदयविकारावर मोफत इलाज - अमरावती शहरातील संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या रुग्णांवर मोफत इलाज केला जातो. 99% रुग्ण हे दारिद्र्यरेषेखालचे असून कोणाकडूनही हृदयविकाराशी संबंधित शस्त्रक्रियेसाठी कुठलेही रक्कम घेतली जात नाही अशी माहिती देखील सुधीर दिवे यांनी दिली.
हेही वाचा - Delhi Warehouse Collapsed : दिल्लीत बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली.. ६ कामगारांचा मृत्यू