अमरावती - ग्रिफॉन वल्चर (Griffon Himalaya Vultures) प्रजातीचे हिमालय गिधाड अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या (Satpura Mountain Range) कुशीत असणाऱ्या मेळघाटात आढळून आले. प्रचंड अंतर कापून हे गिधाड मेळघाटात (Himalayan vultures found in melghat) आल्यामुळे मेळघाटवासिय आश्चर्यचकीत झाले आहेत.
2013 मध्येही हिमालयीन गिधाड आले होते मेळघाटात
मेळघाटात हिमालय गिधाड आल्याची ही पहिली घटना नसून यापूर्वी 2013 मध्ये सुद्धा मेळघाटात ढाकणा वनपरिक्षेत्रात हिमालयीन गिधाड आढळून आले होते, अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी 'ईटीवी भारत'शी बोलताना दिली. हिवाळ्यात हिमालयातील पक्षी मोठ्या संख्येने भारतात येतात. यामध्ये या गिधाडांचाही समावेश आहे. बिहार ,केरळमध्ये सुद्धा हिमालय गिधाडे अनेकदा आढळून आली आहेत. थव्यामधून भरकटल्यामुळे ही गिधाडे उंच आकाशात उडताना त्यांना नेमकं खाली कुठे उतरावे हे लक्षात येत नाही. ते अनेक दिवस उपाशी राहतात. नेमक कुठे उतरता येईल आणि कुठे आपल्याला खाद्य मिळेल याचा अंदाज आल्यावर ही गीदाड जमिनीवर उतरतात. आता सुद्धा मेळघाटात आलेले गीदाड भरकटले. यामुळेच इतक्या दूर पर्यंत ते पोचले आहेत. वन विभागाच्या वतीने या गिधाडांवर उपचार करून त्यांना सोडण्यात येते असे ही डॉ. जयंत वडतकर म्हणाले.
हेही वाचा - MLA Raju Karemore Bail : रात्र तुरुंगात घातल्यानंतर आमदार राजू कारेमोरेंची सकाळी सुटका