अमरावती - वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सकाळपासून बाजारपेठ उघडायला लागली आहे. यासोबतच सकाळच्या सत्रातील शाळाही नेहमीप्रमाणे सुरू झाल्या आहेत. दुपारी मात्र बंद समर्थक रस्त्यावर उतरण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रत्येक हालचालींकडे करडी नजर ठेवून आहेत.
देशात ढासळत्या अर्थव्यवस्थेच्याविरोधात सरकारला जाब विचारण्यासह नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. सरकारने देशातील महत्वाच्या कंपन्या विकायला काढल्या असल्याचा विरोधही वंचितने केला आहे.
बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमरावती शहरातील महत्वाच्या अशा राजकमल चौक, चित्रा चौक, इतवारा बाजार, रेल्वे स्टेशन चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इर्विन चौक येथे एकत्रित येत आहेत. दुपारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शहर बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
वंचितच्या बंद संदर्भातल्या सर्व बातम्या -
मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक
Live: घाटकोपरमध्ये 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद तर कुर्ल्यात हिंसक वळण
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर 'वंचित'कडून रास्तारोकोचा प्रयत्न