अमरावती - जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन काल एक बालक दगावल्याची घटना काल घडली होती. या संदर्भात एक तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी नवनीत कौर, खासदार अनिल बोंडे उपस्थित होते. या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खोट बोला, पण भेटून बोला असा हा विषय आहे. कुठेही राजकारण करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी यशोमती ठाकूर यांना लगावला आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी ६ कोटीची तरतूद - देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात (2018)मध्ये 49 कोटी रुपये स्त्री रुग्णालयात उपलब्ध करून दिले होते. माजी पालकमंत्री ठाकूर यांनी पाच साडेपाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असता तर रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले असते. आणि ही आजची घटना घडली नसती, असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे
जिल्हा नियोजन निधी मधून १ कोटी - जिल्हाधिकारी यांनी १ कोटी उपलब्ध करून दिले आहेत. इमारत दुरुस्ती, मूलभूत सोयी सुविधा आणि महत्त्वाची उपकरण खरेदी करण्यासाठी हा निधी वापरण्यात यावा, अशी सूचना फडणीस यांनी केल्याचे रवी राणा यांनी सांगितले.
काय घटना घडली होती? - जिल्हा स्त्री रुग्णालयाततील बेबी केअर सेंटरला आग काल लागली होती. परिणामी धुरामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या चिमुकल्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अमरावती जिल्हा महिला रुग्णालय येथील बेबी केअर सेंटर आहे. त्या सेटरला अचानक आग लागली होती. परिणामी घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. सुदैवाने अग्निशामन दलाने दोन पाण्याच्या बंबाच्या सहायाने ही आग विझवली. बालकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. परंतु, काल संध्याकाळी उशिरा एक बालक दगावले होते.