अमरावती - भारताच्या स्वातंत्र्यदिवस तसेच गणतंत्रदिनाच्या (Independence Day and Republic Day) पर्वावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चिन्हांची भेट देण्याची परंपरा अमरावती शहरातील संत कबीर राम विद्यालयात शारीरिक शिक्षक असणारे संतोषकुमार अरोरा यांनी 29 वर्षांपासून जोपासली आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे.
..अशी झाली सुरुवात -
मुळात खेळाडू असणारे संतोषकुमार अरोरा यांना देशाप्रती अत्यंत आदर आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना छोट्या आकारातील कागदाचे राष्ट्रीय ध्वज भेट स्वरूपात द्यावे अशी कल्पना त्यांना 1993 मध्ये सुचली. 26 जानेवारी 1993 ला त्यांनी वीस रुपयाला कागदाचे एकूण 200 लहान आकारातील राष्ट्रध्वज खरेदी केले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांनी या राष्ट्रध्वजाचे वितरण केले. यानंतर 15 ऑगस्ट 1993 रोजी सुद्धा त्यांनी अशाच स्वरूपाचे कागदाचे राष्ट्रीय ध्वज खरेदी करून शाळेतील विद्यार्थ्यांना वितरीत केले. येथूनच स्वातंत्र्यदिन आणि गणतंत्र दिनाच्या पर्वावर संतोष कुमार अरोरा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसह अमरावती शहरातील विविध शाळा आणि तालुका स्तरावरील शाळेत राष्ट्रीय चिन्हांचे वितरण करीत आहेत.
राष्ट्रीय सणाच्या पर्वावर राष्ट्रीय चिन्हांची भेट.. अमरावतीतील शिक्षकाचा 29 वर्षापासून उपक्रम - राष्ट्रीय सणाच्या पर्वावर राष्ट्रीय चिन्हांची भेट
भारताच्या स्वातंत्र्यदिवस तसेच गणतंत्रदिनाच्या (Independence Day and Republic Day)पर्वावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चिन्हांची भेट देण्याची परंपरा अमरावती शहरातील संत कबीर राम विद्यालयात शारीरिक शिक्षक असणारे संतोषकुमार अरोरा यांनी 29 वर्षांपासून जोपासली आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे. जाणून घेऊया त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल..