अमरावती - अमरावती हिंसाचार (Amravati Violence) प्रकरणी काल स्वतःहून अटक करून घेतलेले अमरावतीचे माजी पालकमंत्री तसेच माजी मंत्री जगदीश गुप्ता (Jagdish Gupta) यांना काल रात्री उशिरा अमरावतीच्या न्यायालयाने (Amravati Court Grant Bail to bjp leaders) जामीन मंजूर केला आहे. माजी पालकमंत्री प्रवीण पोटे (praveen pote) यांना 15 हजाराच्या जात मूचलक्यावर तर जगदीश गुप्ता (Jagdish Gupta) यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. तसेच दोघांनाही 15 दिवस शहराबाहेर राहावे लागणार आहे. अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी या दोन्ही भाजपच्या नेत्यांवर गुन्हे केले होते. त्यानंतर काल भाजप प्रवीण पोटे हे यांनी स्वतःहून अटक करून घेतली. त्यानंतर माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनाही पोलिसांनी अटक केली होती.
भाजपा नेत्यांना हद्दपार होण्याचे आदेश -
दरम्यान, काल दोघांनाही सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान रात्री दहा वाजेपर्यंत चाललेल्या न्यायालयाच्या या कामकाजामध्ये माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर तर जगदीश गुप्ता यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता (Former Guardian Minister of Amravati Jagdish Gupta) यांना 15 दिवस अमरावती शहरा बाहेर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. काल पोलिसांनी 15 जणांना अटक केली होती. त्यापैकी चार जणांना जामीन नाकारण्यात आला आहे.
अमरावतीतील कसा झाला हिंसाचार -
त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ शुक्रवारी एका समूहाच्यावतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा दरम्यान पाच ते सात दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी शनिवारी अमरावती शहर बंदची हाक दिली होती. त्यामुळे शनिवारी अनेक संघटना या रस्त्यावर उतरल्या होत्या. याच दरम्यान अमरावतीमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. यावेळी जाळपोळ, दगडफेक देखील झाली होती. तर शहराच्या एका भागामध्ये दोन समूहाचे लोक आमने-सामने आल्याने मोठा हिंसाचार झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संचारबंदी लावण्यात आली आहे.
'अमरावतीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट' -
शहरातील हिंसाचारानंतर महाराष्ट्र सायबर क्राईमचे काही अहवाल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या हाती आले आहे. मात्र, हे अहवाल अतिशय धक्कादायक आहे. तर अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशी खळबळजनक माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. तर काही वेळ इंटरनेट (Internet shut down In Amravati) सुरु झाल्यानंतर 4 हजार ट्विट झाले हे आक्षेपार्ह असल्याचेही या अहवालात दिसून येत आहे, असेही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
हेही वाचा - Amravati Violence : हॉटेल व्यावसायिक दररोज करतोय बंदोबस्तातील पोलिसांच्या जेवणाची सोय