ETV Bharat / city

महामार्गालगतच्या टेकडीवरील रोपांना वनविभागाकडून टँकरने पाणीपुरवठा - tree

शहरातून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गालगत वनविभागाच्या १३ हेक्टर ओसाड टेकडीवर वनविभागाकडून रोपवाटिका लावण्यात आली आहे.

रोपांना टँकरने पाणीपुरवठा
author img

By

Published : Apr 7, 2019, 1:52 PM IST

अमरावती - शहरातून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गालगत वनविभागाच्या १३ हेक्टर ओसाड टेकडीवर वनविभागाकडून रोपवाटिका लावण्यात आली आहे. आजवर दुर्लक्षित असणाऱ्या या भागात एप्रिलच्या भर उन्हात याठिकाणी लावलेल्या रोपट्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

प्रफुल्ल फरतोडे माहिती देताना

पूर्वी ओसाड असणाऱ्या या टेकडीवर जुगार, दारू आदी अवैध प्रकार सुरू होते. वर्षभरापूर्वी वनविभागाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष दिले. संपूर्ण १३ हेक्टरच्या या भागाला तार कंपाऊंड करण्यात आले आहे. या भागात विविध प्रजातींची ३ हजार ६०० रोपे लावण्यात आली आहेत. या रोपट्यांना जुन्या महामार्गावर असलेल्या ऑक्सिजन पार्क मधून टँकरने पाणी आणून दिले जात आहे.

वड, पिंपळ, कडुनिंब इत्यादी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांसह कटांग बांबू, आंबा, चिंच, उंबर, आवळा, जांभूळ अशा फळवृक्षांची रोपे या भागात लावण्यात आली आहेत. वडाळी वनविभागाचे वनरक्षक प्रफुल फरतोडे वृक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, वनसंरक्षक भूम्बर, वर्तुळ अधिकारी घोगरे यांच्या मार्गदर्शनात ओसाड टेकडी हिरवीगार टेकडी व्हावी, यासाठी या भागात प्रयत्न सुरू आहेत.

मागील २५ दिवसांपासून ६ महिला मजूर याठिकाणी टँकरमधून आणलेले पाणी रोपांना देत आहेत. याठिकाणी रोप लावताना लगतच्या जंगलातील भवानी तलावातील गाळ बुडाशी टाकून रोपे लावण्यात आली आहेत. उन्हाळ्यात या रोपांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही, असे वनरक्षक फरतोडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. वर्ष दोन वर्षात ही टेकडी हिरव्यागार दाट झाडांनी बहरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Intro:अमरावती शहरातून जाणाऱ्या द्रुतगती महामार्गालगत वन विभागाच्या १३ हेक्टर ओसाड टेकडीवर वनविभागाकडून रोपवाटिका लावण्यात आली आहे. आजवर दुर्लक्षित असणाऱ्या या भागात एप्रिलच्या भर उन्हात याठिकाणी लपवलेल्या रोपट्यांना टँकरने पाणी पुरवठा करुन वाढविण्यात येत आहे. जगविण्यात येत आहे.

Body:वड, पिंपळ, कडुनिंब या ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षणासह कटांग बांबू तसेच आंबा, चिंच, उंबर, आवळा, जांभूळ अशा फळवृक्षांची रोपं या भागात लावण्यात आली आहे. वडाळी वन वृत्ताचे वनरक्षक प्रफुल फरतोडे हे हा परिसर वृक्षांनी ताटावीत व्हावा यासाठी मेहनत घेत आहेत. उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, वनसंरक्षक भूम्बर, वर्तुळ अधिकारी घोगरे यांच्या मार्गदर्शनात ओसाड टेकडीचा हिरवीगार टेकडी व्हावी यासाठी या भागात जोमाने प्रयत्न सुरू आहेत.
पूर्वी ओसाड असणाऱ्या या टेकडीवर जुगार, दारू आदी अवैध प्रकार चालायचे. बर्षभरपूर्वी वनविभागाने या भागाकडे गांभीर्याने लक्ष दिले. संपूर्ण १३ हेक्टरच्या या भागाला तार कंपाऊंड केले आहे.
या भागात आज विविध प्रजातींची ३६०० रोपं लावण्यात आली आहेत. या रोपट्यांना जुन्या महामार्गावर असलेल्या ऑक्सिजन पार्क मधून टँकरने पाणी आणून दिले जात आहे. गत २५ दिवसांपासून ६ महिला मजूर याठिकाणी टँकरमधून आणलेले पाणी रोपांना देत आहेत. याठिकाणी रोप लावताना लगतच्या जंगलातील भवानी तलावातील गाळ बुडाशी टाकून रोपं लावण्यात आली आहे. उमहालाभर या रोपांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही असे वनरक्षक फरतोडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणले. वर्ष दोन वर्षात ही टेकडी हिरव्यागार दाट झाडांनी बहरेल असा विश्वासही प्रफुल फरतोडे यांनी व्यक्त केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.