ETV Bharat / city

Melghat Fog : अमरावतीत झालेल्या अवकाळी पावसाने मेळघाटात धुक्याची चादर; पर्यटकांची मोठी गर्दी - मेळघाट धुकं व्हिडीओ

मेळघाटात ( Fogg In Melghat ) रविवारी पहाटे पूर्णतः धुकं बघायला मिळाले. त्यामुळे पहाटेपासूनच दुकानांमध्ये गुडुप झालेला मेळघाट रविवारी दिवसभर पर्यटकांसाठी ( Tourist Crowd In Melghat ) खास पर्वणीच ठरला. विकेंडमध्ये मेळघाटात आलेल्या पर्यटकांना जानेवारी महिन्यात श्रावण महिना सारखा अनुभव घेता आल्याने पर्यटकांनी प्रचंड आनंद लुटला.

fog in Melghat due to rain on Saturday
fog in Melghat due to rain on Saturday
author img

By

Published : Jan 10, 2022, 6:39 PM IST

Updated : Jan 10, 2022, 7:17 PM IST

अमरावती - शनिवारी अचानक कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मेळघाटात ( Fog In Melghat ) रविवारी पहाटे पूर्णतः धुकं बघायला मिळाले. त्यामुळे पहाटेपासूनच दुकानांमध्ये गुडुप झालेला मेळघाट रविवारी दिवसभर पर्यटकांसाठी ( Tourist Crowd In Melghat ) खास पर्वणीच ठरला. विकेंडमध्ये मेळघाटात आलेल्या पर्यटकांना जानेवारी महिन्यात श्रावण महिना सारखा अनुभव घेता आल्याने पर्यटकांनी प्रचंड आनंद लुटला.

पाऊस कोसळला अन वातावरण बहरले -

अमरावती जिल्ह्यात शनिवारी दुपारपासूनच अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्याच्या विविध भागात गारपीट झाली असताना मेळघाटात मात्र शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि रविवारी पहाटे पाच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे पानगळीला सुरुवात होणाऱ्या दिवसांमध्ये मेळघाटचा रंग अचानक बदलला आणि जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून तसेच लगतच्या मध्यप्रदेशातून आलेल्या पर्यटकांना जणू हिमाचल प्रदेश किंवा काश्मीरमध्येच फिरत असल्याचा अनुभव आला.

प्रतिक्रिया

या पर्यटन स्थळावर होती गर्दी -

मेळघाटातील चिखलदरा, आमझरी, सेमाडोह, कोलकास या मुख्य पर्यटन केंद्रांवर शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची गर्दी होती. सुट्टीचे दिवस असल्यामुळे अनेक शासकीय अधिकारी सुद्धा मेळघाटातील विविध विश्रामगृहावर मुक्कामी होते. खासगी हॉटेल आणि वनविभागाच्या पर्यटन संकुलावर सुद्धा गर्दी होती.

पर्यटकांनी घेतला वनभोजनाचा आनंद -

शनिवारी कोसळलेल्या पावसानंतर मेळघाटातील रविवारचे वातावरण नक्कीच बहरले. त्यामुळे काही पर्यटक स्वयंपाकाच्या साहित्यासह मेळघाटात आले होते. जंगलात खुल्या मैदानात स्वयंपाक करून धुक्याचे वातावरण आणि थंडीची झुळूक याचा आनंद लुटत वनभोजनाचा आनंदही अनेक पर्यटकांनी रविवारी घेतला.

हेही वाचा - Amravati 18th century Well : अमरावतीतील 'या' गावात आहे 12 दरवाजे असलेली मुघलकालीन विहीर

Last Updated : Jan 10, 2022, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.