ETV Bharat / city

अमरावतीच्या रेडिएन्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 'फायर मॉक ड्रिल' - रेडिएन्ट हॉस्पिटल अमरावती

आग लागल्यास सर्वात आधी आपल्याला समजुतदारपणाने, विश्वासाने, धैर्याने, डोकं शांत ठेवून स्वतःला व इतरांना वाचवायचे असते. त्यासाठी त्यांनी महत्वाचे बारकावे प्रशिक्षणाच्या माध्यमातून समजावून सांगितले.

अमरावतीच्या रेडिएन्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 'फायर मॉक ड्रिल'

author img

By

Published : May 3, 2021, 1:45 PM IST

अमरावती : येथील रेडिएन्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अमरावती महापालिका अग्निशमन विभागाच्या पथकाने फायर मॉक ड्रिल करत आपत्कालीन बचावाचे प्रशिक्षण दिले. कोरोना संकटात विविध ठिकाणी रुग्णालयांमध्ये आग लागल्याच्या घटना समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रिल करण्यात आले हे विशेष.

अमरावतीच्या रेडिएन्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 'फायर मॉक ड्रिल'
आग लागण्याच्या कारणांची दिली माहितीअग्निशमन विभागाचे प्रमुख सय्यद अन्वर यांनी सुरुवातीला आग लागण्याची कारणे समजावून सांगितली. आगीमध्ये मुख्य करून तीन गोष्टींचा समावेश असतो. यामध्ये जळणारी वस्तू, उष्णता आणि ऑक्सिजन. या तीन पैकी एक जरी नसेल तरी आग लागणार नाही. म्हणून आग लागल्यास सर्वात आधी आपल्याला समजुतदारपणाने, विश्वासाने, धैर्याने, डोकं शांत ठेवून स्वतःला व इतरांना वाचवायचे असते. त्यासाठी त्यांनी महत्वाचे बारकावे प्रशिक्षणाच्या माध्यमातून समजावून सांगितले. तसेच कार्बन बॉडी, लिक्विड बॉडी फॉर्म, गॅस स्वरूपात एलपीजी, मेटल फायर, इलेक्ट्रिक फायर असे आगीचे प्रकार असल्याची माहिती सय्यद अन्वर यांनी दिली. याशिवाय आग विझवणारी ही व्यक्ती कोणीही असू शकते. स्त्री, पुरुष, डॉक्टर, कंपाउंडर, वॉर्डबॉय, नर्स. यामुळे याविषयी सर्वांनाच माहिती असणे अत्यावश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.प्रात्यक्षिकातून बचावाचे प्रशिक्षणआपल्याजवळ उपलब्ध असलेल्या सिलिंडरचा योग्य वापर करण्याचेही प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम सेफ्टी पिन काढून नंतर सिलिंडरमधील गॅस co2 किंवा ड्राय केमिकल पावडर यांचा मारा कसा करावा त्याबद्दल माहिती दिली व प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. तसेच पाण्याचा मारा कसा करावा आय.सी.यू. किंवा रूम मधील भरती रुग्णांना कशा पद्धतीने सुरक्षित ठिकाणी हलवावे यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या ठिकाणी आगीमुळे खूप धुर झाला असेल आणि आपला जीव गुदमरत असेल अशावेळी झोपलेल्या स्थितीत नाक जमिनीला समांतर ठेवून हाताच्या व पायाच्या साह्याने कसा बचाव करावा याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले.डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थितीमहानगरपालिका अग्निशमन विभागाच्या पथकामध्ये उपकेंद्र प्रमुख सय्यद अन्वर, सुशांत तायडे, शिवा आडे, विक्की हिवराळे व राजू शेंडे यांनी प्रात्यक्षिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून फायर मॉक ड्रिल केले. या प्रशिक्षणाकरिता रेडिएन्ट सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. पवन अग्रवाल डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. आनंद काकाणी, डॉ. सीमा अडवाणी ,डॉ. माधुरी अग्रवाल, डॉ. अनुराधा कांकानी, डॉ.हर्षाली लकरिया, हरीश कुकलकर, पवन इंगोले, राहुल कुकलकर, सारंग लकडे, ज्ञानेश्वर गोरडे व इतर हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.