ETV Bharat / city

शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा अमरावतीत कोविड रुग्णालयात विनामास्क घुसण्याचा प्रयत्न.. - अमरावतीत कोविड रुग्णालयात विनामास्क घुसण्याचा प्रयत्न

कोरोना व्हायरसचा वाजागाजा सरकार करत असल्याचा दावा करत शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आज अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये विनामास्क घुसण्याचा प्रयत्न केला.

Farmer leader Prakash Pohare
Farmer leader Prakash Pohare
author img

By

Published : Mar 1, 2021, 7:15 PM IST

Updated : Mar 1, 2021, 10:20 PM IST

अमरावती - राज्यात आणि अमरावतीत एकीकडे कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात कोरोना व्हायरसचा वाजागाजा सरकार करत असल्याचा दावा करत शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आज अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी कोविड रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये विनामास्क घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असून शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्यासह दोघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमरावती शहर, अचलपूर शहर, अंजनगाव सुर्जी शहर व अन्य नऊ गावात लॉकडाऊन सुद्धा लावण्यात आले आहे. कोरोनाच्या नावाखाली लोकांची लूट होत असल्याचा आरोपही शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केला आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी मी कोरोना वार्डात जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रकाश पोहरे म्हणाले.

शेतकरी नेते प्रकाश पोहरे
कोरोना आजाराचा हा निव्वळ बागलबुवा असून केवळ लोकांना याची भीती दाखवली जात आहे. यात मेडिकल कंपन्याचे बाजारीकरण होत आहे. तसेच मेडिकल कंपन्यांनी लोकांना लुटण्यासाठी हे सर्व षडयंत्र आखल्याचा गंभीर आरोप प्रकाश पोहरे यांनी केला आहे.सध्या राज्यात अधिवेशन होऊ घातले आहे. परंतु हे अधिवेशन होऊ द्यायचे नाही हे टाळण्यासाठी कोरोनाला पुढे केले जात आहे, असे पोहरे म्हणाले. त्यात आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. गॅसचेही दर वाढले आहेत त्यामुळे लोक रस्त्यावर उतरणार हे सरकारला माहीत आहे. त्यामुळे हे सर्व थांबवण्यासाठी कोरोनाचा बाऊ केला जात असल्याचे प्रकाश पोहरे म्हणाले.

Last Updated : Mar 1, 2021, 10:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.