ETV Bharat / city

ड्रग्स प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी केली जाते - गृहमंत्री वळसे पाटील

राज्यातील नामवंत व्यक्तींना टार्गेट करून महाराष्ट्रात केवळ ड्रग्सचा वापर होतो असे वातावरण निर्माण करून महाराष्ट्राची बदनामी केली जात असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज अमरावतीत म्हटले आहे.

Minister dilip Walse Patil
गृहमंत्री वळसे पाटील
author img

By

Published : Oct 23, 2021, 7:21 PM IST

Updated : Oct 23, 2021, 8:23 PM IST

अमरावती - राज्यातील नामवंत व्यक्तींना टार्गेट करून महाराष्ट्रात केवळ ड्रग्सचा वापर होतो असे वातावरण निर्माण करून महाराष्ट्राची बदनामी केली जात असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज अमरावतीत म्हटले आहे. अमरावती परिक्षेत्रातील तसेच अमरावती शहर आयुक्तालय अंतर्गत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री आज अमरावतीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
  • पोलिसांचा ताण कमी करणार-

कोविड काळात पोलिसांनी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावले आहे. पोलिसांना चांगला निवारा मिळावा यासाठी पोलीस गृहनिर्माण प्रकल्प प्राधान्याने पूर्ण केले जाणार आहेत. पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होताना अधिकारी म्हणून निवृत्त व्हावेत यासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिपाईपदी रुजू झालेल्या व्यक्तीला त्याच्या पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नतीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस विभागाची ताकद तसेच क्षमता वाढणार आहे. महिला पोलिसांच्या कामाचे तासही कमी करण्याच्या निर्णयासह मनुष्यबळ वाढवण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामुळे पोलिसांचा ताण कमी होईल, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - औरंगाबाद नामांतर : शासनाच्या GR मध्ये संभाजीनगर उल्लेख; एमआयएम-शिवसेना आमनेसामने

  • जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज -

पोलीस ठाण्यात आपली तक्रार समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची वागणूक देणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. जनसामान्यांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण करणे ही जबाबदारी पोलिसांचीच आहे. पोलिसांनी आपल्या कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करून उज्वल कामगिरीसाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे. अवैध धंद्यांना आळा घालावा, प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रमाण वाढवणे, गुन्हेगाराला कठोर शासन व्हावे, गुणवत्तापूर्ण तपास करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करून कायद्याची जरब निर्माण करणे, असे निर्देश आज दिले असल्याचे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

  • राष्ट्रवादीकडून गृहमंत्र्यांचा नागरी सत्कार -

अमरावती पोलीस आयुक्तालयासह अमरावती विभागातील सर्व पोलीस अधीक्षकांची दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली. त्यानंतर अमरावती शहरातील शेगाव नाका परिसरातील अभियंता भवन येथे राष्ट्रवादीच्यावतीने वळसे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि श्री. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विधान परिषदेचे माजी अध्यक्ष शरद तसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले, सुरेखा ठाकरे, संगीता ठाकरे, माजी मंत्री वसुधा देशमुख आदी उपस्थित होते.

हेही वाचा - बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारशी चर्चा सुरू, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री जरदोश यांच्याशी खास बातचित

Last Updated : Oct 23, 2021, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.