अमरावती : बडनेरा ते उत्तमसरा मार्गावरील दडबड शाहा दर्ग्यात Dadbad Shah Dargah on Badnera to Uttamasara road गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याकांडातील double murder mystery in Dadbad Shah Dargah मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पाच पथके तयार केली आहेत. यासह सायबर पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेजची तपासणी केली जात आहे. या दुहेरी हत्याकांडातील मृत कारंजा येथील युवक आपले घर सोडून या दर्ग्यात का राहत होता, याचाही तपास पोलीस करीत आहेत. Police team search Dadbad Shah dargah killer
पोलिसांचा चौफेर तपास - याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत लोकांचे बयाण नोंदविले आहेत. काही दिवसांपूर्वी मृतांपैकी तौफीक रफीक अब्दुल याचे त्याच्या घरच्यांशी मोबाईलवर बोलणे झाल्याची माहिती त्याच्या सोबतच दर्ग्यात असलेल्या वडीलांनी पोलिसांना दिली होती. त्यामुळे मोबाईल क्रमांकाचा सीडीआर काढून पोलिस घेत आहेत. एकूण या प्रकरणात चहुबाजुने पोलिसांचा सुरू आहे.
अशी घडली होती घटना - दडबड शाहा दर्ग्याचे सेवाधारी अनवर बेग अकबर बेग रा.लालखडी व कारंजा येथून दर्ग्यात काही दिवसापासून राहायला आलेला शेख तोफिक अब्दुल रफिक या दोघांची गळा चिरून हत्या करण्यात आली.
पुरावे नसल्याने तपासात अडचणी - या याप्रकरणी लोणी पोलिसानी अज्ञात मारेकऱ्यांविरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मारेकऱ्यांनी घटनास्थळी ठोस पुरावे न सोडल्याने प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण गुन्हे शाखेचे तीन पथक तर लोणी पोलिसांचे दोन पथक तयार केले आहे. त्यांना तपासाच्या दिशा ठरवून देण्यात आल्या आहेत.
सीसीटीव्ही चित्रणाची केली पाहणी - सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दर्ग्यात चार कॅमेरे लावलेले होते. यातील कॅमेरे बंद आहेत. तर एक कॅमेरा प्रवेशव्दारावर दुसरा आतील खोलीत लावलेला होता; परंतु प्रवेशव्दारावरील काहीही दिसत एका खोलीत असलेला कॅमेरा खोलीचा दरवाजा असल्याने बाहेरचे काही दिसत नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. या भागातील व ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून तपासणी आहे.