ETV Bharat / city

Amravati Disaster Management Traning : मनुष्यहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज, प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण - आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण अमरावती जिल्हा

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ( Disaster Management ) मनुष्यहानी होऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत विशेष पथक सज्ज होत आहे. पूर परिस्थितीत उद्भवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी या पथकाचे प्रशिक्षण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होत असून यावर्षी पावसाळ्यात कमीत कमी हानी व्हावी, हेच लक्ष्य या पथकाचे आहे.

Amravati Disaster Management Traning
Amravati Disaster Management Traning
author img

By

Published : Jun 3, 2022, 5:07 PM IST

अमरावती - पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे ( Disaster Management ) मनुष्यहानी होऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत विशेष पथक सज्ज होत आहे. पूर परिस्थितीत उद्भवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी या पथकाचे प्रशिक्षण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होत असून यावर्षी पावसाळ्यात कमीत कमी हानी व्हावी, हेच लक्ष्य या पथकाचे आहे.

जिल्ह्यात आठ ठिकाणी झाले प्रशिक्षण - मान्सून पूर्व तयारी ज्या अनुषंगाने जिल्ह्यातील पूर प्रवण गावातील युवक पोलीस पाटील तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. अमरावती शहरातील वडाळी तलाव येथे 24 मे रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात आले यानंतर दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, मोर्शी, धारणी, चांदुर रेल्वे येथील मालखेड तलाव आणि चिखलदरा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणा अंतर्गत गावात पूर आला तर, नेमकी कशी खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रतिक्रिया

20 जणांचे पथक सज्ज - जिल्ह्यात कुठल्याही स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात 12 महिने 24 तासांसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज आहे. या पथकात राज्य राखीव पोलीस दल, जिल्हा ग्रामीण पोलीस यांचे सर्व मिळून दहा कर्मचारी नेहमीच सज्ज असतात. पावसाळ्यात मात्र नैसर्गिक संकटाची भीती अधिक असल्यामुळे या पथकामध्ये अमरावती महापालिकेतील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह जिल्हा स्तरावरील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा समावेश केला जातो. सुमारे 20 ते 25 जणांचे पथक पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. या पथकाकडे विशेष अशी रबर बोट असून नदीच्या पुरात सापडलेल्या एकूण 10 व्यक्तींना एका बोट द्वारे वाचविता येऊ शकते. या पथकाकडे अशा एकूण चार बोटी आहेत.

गेल्यावर्षी जिल्ह्यावर कोसळले मोठे संकट - गेल्यावर्षी पावसाळ्यात अमरावती जिल्ह्यात अनेक भागांना पुराचा फटका बसला होता. अमरावतीसह भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यातील अनेक गावे गतवर्षी पाण्याखाली बुडाली होती. पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यात सर्वात भीषण घटना 14 सप्टेंबर रोजी वरुड तालुक्यातील झुंज या गावातून वाहणार्‍या वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 झाडांना जलसमाधी मिळाली होती. झुंज या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथक सलग तीन दिवस मृतदेहांचा शोध घेत होते. यावर्षी अशी कुठलीही घटना घडू नये किंवा अशी घटना घडताच संकटात सापडलेलंचा कसा बचाव करावा, याचे प्रशिक्षण ग्रामस्थांना दिले जात आहे.

21 कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत - चक्रीवादळामुळे तसेच वीज पडून नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने नदीच्या पुरात बुडालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने आर्थिक मदत दिली जाते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर, धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी, धारणी, भातकुली, अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर हे सर्व तालुके मिळून नैसर्गिक आपत्तीमुळे दगावलेल्या एकूण 21 जणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत शासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा - Ahmednagar Rename :अहमदनगर नामांतर मुद्द्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले 'थोर व्यक्तींचे नाव समोर येत असेल तर स्वागत'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.