ETV Bharat / city

Delhi Pattern Education Amravati : महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षणाचा दिल्ली पॅटर्न! - दिल्ली पॅटर्न शिक्षण प्रणाली अमरावती

यंदापासून महानगपालिकेच्या शाळेमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण ( municipal school English Amravati ) देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच वर्षी थोडे थाडके नव्हे, तर १४०० विद्यार्थ्यांनी विविध इयत्तेत प्रवेश घेतला आहे. अमरावती महानगरपालिका ( Amravati Municipal Corporation ) अंतर्गत एकूण ६३ शाळा आहेत.

Delhi Pattern Education Amravati
Delhi Pattern Education Amravati
author img

By

Published : Jul 15, 2022, 3:44 PM IST

Updated : Jul 15, 2022, 4:11 PM IST

अमरावती - सरकारी शाळेच्या नावाने नाक मुरडणाऱ्या पालकांनी आता महानगर पालिकेच्या शाळेची वाट धरली आहे. दिल्ली पॅटर्नच्या धर्तीवर शिक्षण देण्यासाठी अमरावती महानगर पालिकेने कंबर कसली आहे. यंदापासून महानगपालिकेच्या शाळेमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण ( municipal school English Amravati ) देण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच वर्षी थोडे थाडके नव्हे, तर १४०० विद्यार्थ्यांनी विविध इयत्तेत प्रवेश घेतला आहे. अमरावती महानगरपालिका ( Amravati Municipal Corporation ) अंतर्गत एकूण ६३ शाळा आहेत. त्यापैकी १३ शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका शिक्षणाधिकारी डॉ. अब्दुल राजीक यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना मनपा शिक्षणाधिकारी

खासगी शाळांच्या धर्तीवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके, गणवेश, टाय, बेल्ट तसेच इतरही साहित्य मोफत देण्यात येते. पहिल्याच वर्षी महानगपालिकेच्या १३ शाळांमधून ४०३ विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात प्रवेश घेतला आहे. लाख रुपये फी भरून खासगी शाळेत प्रवेश घेण्यापेक्षा महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याला नागरिक प्राधान्य देत आहे.

काय आहे शिक्षणाचा दिल्ली पॅटर्न? : सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सरकारी शाळांमधील दोनशे शिक्षकांच्या एका गटाला काही महिन्यांपूर्वी सिंगापूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना 'मेन्टोर टीचर्स' असे बिरूद देण्यात आले. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये ४५ हजारांहून अधिक शिक्षक असून या शिक्षकांचे अध्यापनातील कौशल्य वाढवून त्यांची प्रतिष्ठा वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

हेही वाचा - Firozabad honor killing:फिरोजाबाद ऑनर किलिंग - पित्याने केली मुलीची निर्घृण हत्या

Last Updated : Jul 15, 2022, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.