अमरावती - मेळघाटातील हरीसालच्या आरफओ दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी दिपालीचा आईनी श्रीनिवास रेड्डीवरही कारवाई करा, नाहीतर मला फाशी द्या, अशी मागणी केली आहे.
अन्यथा मलाही फाशी द्या-
दीपाली चव्हाण यांना जंगलात फिरवल्याने त्यांचा गर्भपात झाला. मात्र तरीही त्यांना रजा न देता दुसऱ्याच दिवशी श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार यांनी कामावर हजर राहायला सांगितले व दीपाली कामावर रुजू झाल्या. गर्भपात झाल्यावर महिलांना रजा द्यावी, असा शासकीय आदेश असतांनाही त्रास देण्याच्या उद्देशाने रेड्डी व शिवकुमार यांनी हजर व्हायला लावल्याचा आरोप दीपाली यांच्या आईने केला. त्यांनी आज राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेतली व विनोद शिवकुमार पोलीस कोठडीत असला तरी रेड्डी यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावे व कडक कारवाई करावी, अन्यथा मलाही फाशी द्या, अशी मागणी दिपालीचा आईनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली.
माझ्या मुलीचा रेड्डी व विनोद शिवकुमार यांनी जीव घेतला त्यामुळे त्यांना तात्काळ वनसेवेतून बडतर्फ करा व दोघांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी दिपालीची आई शकुंतला यांनी केली. तर यशोमती ठाकूर यांनी दिपालीच्या आईला ठोस आश्वासन देत दिपालीच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा- भाजपला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना नव्या गृहमंत्र्यांचा इशारा