ETV Bharat / city

curfew in amravati अमरावतीत आज कागदावरच संचारबंदी, शहरात सर्वकाही सुरळीत - BJP protesting against Amravati violence

अमरावती शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने पोलीस आयुक्त आरती सिंह (Police Commissioner Aarti Singh) यांनी आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत अमरावतीत संचारबंदी (curfew in amravati) घोषित केली आहे. मात्र, ही संचारबंदी केवळ कागदावरच असून शहरात सर्वकाही सुरळीत सुरू असून, सर्वत्र शांततेचे वातावरण आहे.

curfew in amravati
अमरावतीत आज कागदावरच संचारबंदी
author img

By

Published : Nov 22, 2021, 4:10 PM IST

Updated : Nov 22, 2021, 9:54 PM IST

अमरावती - अमरावती शहरात 12 आणि 13 नोव्हेंबरला उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ (amravati violence) आज संपूर्ण राज्यात भाजपच्या वतीने निषेध नोंदविला जता आहे. असे असताना अमरावती शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने पोलीस आयुक्त आरती सिंह (Police Commissioner Aarti Singh) यांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अमरावतीत संचारबंदी (curfew in amravati) घोषित केली आहे. मात्र, ही संचारबंदी केवळ कागदावरच असून शहरात सर्वकाही सुरळीत सुरू असून, सर्वत्र शांततेचे वातावरण आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - मंत्री यशोमती ठाकूर यांच्यामुळेच जिल्ह्यातील शांतता भंग - भाजप जिल्हाध्यक्ष

पोलीस आयुक्तांनी लागू केली संचारबंदी

अमरावती शहरात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी शहरात उसळलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात निषेध नोंदविण्यात येत आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे याकरिता राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Police Commissioner Aarti Singh) यांनी सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली होती. मात्र, शहरात संचारबंदीचा कुठलाही परिणाम जाणवत नसून शहरातील संपूर्ण बाजारपेठ उघडली आहेत. यासह शाळा सुद्धा सुरू असून शहरात सर्वत्र वर्दळ पाहायला मिळत आहे. यामुळे पोलीस आयुक्तांनी आज जो काही संचारबंदीचा आदेश दिला आहे, तो आदेश कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

शहर पूर्वपदावर, पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम

12 आणि 13 नोव्हेंबर रोजी अमरावती शहरात हिंसाचार उफाळून आल्यानंतर संपूर्ण आठवडाभर पोलिसांनी संचारबंदी घोषित केली होती. शहरातील वातावरण चिघळू नये यासाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा शुक्रवारपासून सुरू केल्यावर संचारबंदी हळूहळू शिथिल करण्यात आली. गत दोन दिवसांपासून अमरावती शहर पूर्वपदावर आले असताना आज पोलीस आयुक्तांनी दिवसभर संचारबंदी घोषित करण्याचे आदेश दिले होते, मात्र पोलीस आयुक्तांचा आदेश कागदोपत्रीच असल्याने आज संपूर्ण शहर पूर्वपदावर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त अद्यापही कायम आहे. शहरातील राजकमल चौक, चित्रा चौक, इरविन चौक, पठाण चौक या भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त अद्यापही कायम आहे.

हेही वाचा - Amravati violence : राज्यातील दंगली पूर्वनियोजित, चौकशी व्हावी; देवेंद्र फडणवीस

Last Updated : Nov 22, 2021, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.