अमरावती - 'तुम्हीच यशोमतीताईंना वाघीण की रणरागिणी म्हटले आहे. मी गेली अनेक वर्षे विधानसभेत यशोमती ताईंना पाहत आलो आहे. मतदारसंघतील लोकांच्या, तुमच्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी या रणरागिणी भांडत असतात. वेळ आली तर तुमच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायलाही त्या मागेपुढे पाहत नाही', असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. नाना पटोले यांच्या विदर्भ दौऱ्याचा रविवारी समारोप झाला. तेव्हा ते अमरावतीच्या तिवस्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.
'..तर तिवसा विधानसभा मतदारसंघाचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवणार'
यावेळी बोलताना नाना पटोले यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांची भरभरून प्रशंसा केली. नाना पटोले म्हणाले की तिवसा मतदारसंघ हा संघटनात्मक बांधणीसाठी आदर्श ठरावा. तुम्ही जर माझ्या विनंतीला साथ दिली, तर या मतदारसंघाचा पॅटर्न राज्यभर राबवणार, असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - ठरलं..! ओबीसींच्या न्यायहक्कांसाठी शिबीर भरणार, तारीख आणि ठिकाणही ठरले