ETV Bharat / city

आगामी बजेटमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विमानतळासाठी मिळणार निधी - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावती

अमरावतीमधील रखडलेला विमानतळ प्रकल्प आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला निधी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांन आज दिले.

ajit pawar
ajit pawar
author img

By

Published : Feb 8, 2021, 4:18 PM IST

अमरावती - शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या रखडलेल्या व अर्धवट कामाला गती मिळण्यासाठी तसेच अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आगामी बजेटमध्ये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

आमदार सुलभा खोडकेंनी वेधले लक्ष

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजना संदर्भात आढावा बैठक सोमवार जिल्हाधिकारी कार्यालय परिसर स्थित नियोजन भवन येथे संपन्न झाली. या बैठकी दरम्यान नामदार अजितदादा पवार यांनी जिल्हानिहाय वार्षिक नियोजनाचा आढावा घेतला. या दरम्यान अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी अमरावतीच्या विकास संदर्भात विविध मुद्यांकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले .

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची मागणी

२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात नामदार अजित पवार यांनी अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती ,त्यामुळे अमरावतीत सन २०२१-२०२२ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भातील नियोजन सुरु झाले आहे . अमरावतीत वैद्यकीय महाविद्याल लवकरात लवकर सुरु झाल्यास जिल्हातील रुग्णांना उपचारासाठी बाहेर ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही , यासोबतच मेळघाट सारख्या कुपोषणाच्या प्रश्नावर निश्चितच ठोस उपाययोजना करता येतील , याकरिता अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा , अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली आहे.

विमानतळाच्या कामाकडे वेधले लक्ष

आमंदार सुलभा खोडके यांनी अमरावती मधील बेलोरा विमानतळाचे काम हे निधी अभावी व तांत्रिक कारणांनी रखडले असून येथून विमान सेवा सुरु होण्यास विलंब लागत असल्याची बाब विनंती पत्राद्वारे उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली . महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादितद्वारे वर्ष २०१० मध्ये बेलोरा विमानतळ अमरावतीच्या वाणिज्यीक उपयोग करण्यासाठी ए-३२० क्षमतेच्या विमानाची वाहतूक होण्याच्या दृष्टिने अस्तित्वातील धावपट्टीचा विकास करण्याचे काम प्रस्तावित आहे. परंतु अजूनही ती धावपट्टी पूर्णत्वास आली नाही . तसेच सुसज्ज्य अशी प्रशासकीय इमारत ,ज्यामध्ये कन्ट्रक्शन ऑफ पेसेंजर टर्मिनल बिल्डिंग, एटीसी टॉवर , इलेक्ट्रिक सब-स्टेशन अँड असोसिएटेड वर्क्स आदी कामांसाठीची निविदा प्रक्रिया ३१ ऑगस्ट.२०२० रोजी पूर्ण करण्यात आली आहे . सदरची निविदा मंजुरीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे . त्यामुळे बेलोरा विमानतळ येथील विकासाचे कामकाज पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर बैठक आयोजित करून सदर कामांना गती देण्यात यावी . अशी मागणी आमदार. सुलभा खोडके यांनी केली आहे . या मागणीला देखील उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शविली. तसेच या कामांकरिता पर्याप्त निधी बजेट मध्ये उपलब्ध करून देऊ , असे आश्वासनसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.