अमरावती - राज्यात संचारबंदी लागू झाल्याने सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा गावठी दारूकडे वळवला आहे. त्यामुळे आता गावठी दारू बनवण्याचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात पोलिसांनी अशा अवैध दारू अड्ड्यांवर कारवाईचा सपाटा सुरू आहे. शनिवारी सकाळी चांदूर रेल्वे पोलिसांनी तालुक्यातील गौरखेडा येथे दोन ठिकाणच्या गावठी अड्ड्यावर धाड टाकुन ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा... तबलिगी मरकझ: लातुरात क्वारंटाईन केलेल्या 'त्या' 12 पैकी 8 जणांचा अहवाल 'पाॅझिटिव्ह'
चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौरखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवली जात होती. ही माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून एकुण ६४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दारू बनवण्यासाठी वापरणारे सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच पोलिसांनी राहुल सुभाष पवार (२४) व राजेश्री सनोज पवार (२४) दोघेही राहणार गौरखेडा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही फरार आहेत. ही कारवाई पोलीस निरिक्षक दीपक वानखडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या एकूण पथकाने केली.