अमरावती - नागपूर येथील न्यायमूर्ती नांदगाव टोलनाक्यावर येणार असल्याती माहिती देऊनही व्हिआयपी लेन बंद ठेवल्यामुळे न्यायमूर्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर न्यायमूर्तींच्या तक्रारीवरून तीन टोल कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सतीश सवाईकर, हरिष कापडे आणि राजेंद्र मूळे अशी तीनही टोल कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
हेही वाचा... आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू करणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नागपूर येथील न्यायमूर्ती अमरावतीला येत असल्याची सुचना नांदगाव टोल प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, माहिती देऊनही व्हिआयपी लेन बंद ठेवल्यामुळे काही वेळ न्यायमूर्तींना टोल नाक्यावर वाट पहावी लागली. यामुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर न्यायमूर्तींच्या तक्रारीवरून तीन टोल कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
हेही वाचा... 'फिरसे पंगा लेना है', पाहा कंगनाच्या 'पंगा' चित्रपटाचा ट्रेलर
न्यायमूर्ती अमरावतीला येत असल्याची माहिती नियंत्रण कशाला मिळाली होती. त्यानुसार तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथून स्कॉडिंग करण्यात आले होते. न्यायमूर्ती येत असल्याची माहिती टोल नाक्याला दिली. तसेच त्यांचा वाहन क्रमांक कळवण्यात आला होता. त्यामूळे व्हिआयपी मार्गिका खुली करण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र, तरिही न्यायमूर्ती यांचा ताफा आल्यानंतर मार्गिका बंद होती. त्यामुळे न्यायमूर्ती काही वेळ टोलनाक्यावर थांबावे लागले. अखेर न्यायमूर्तींच्या तक्रारीनंतर तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करत त्यांना समज पत्र देण्यात आले आहेत.
हेही वाचा... भाजपला उतरती कळा, अहंकारी राजकारणाला झारखंडने नाकारले - शरद पवार