अमरावती - अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान विज्ञान महाविद्यालयात गैरकारभार ( Balapur ACS College Mismanagement ) होत असल्याचा आरोप करत महाविद्यालयाचे संचालक मंडळाने केला आहे. तसेच याची माहिती विद्यापीठाच्या निदर्शनात देखील आणून दिली. मात्र, यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने या संचालक मंडळातील काही सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोर ( SGBAU ) उपोषणाला बसले. याठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू ( Bacchu Kadu Visit SGBAU Campus ) यांनी भेट दिली. यावेळी कुलसचिव हेंमत देशमुख ( Hemant Deshmukh ) यांच्यावर हयगय केल्याचा आरोप करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे. 'मी राज्यमंत्री आहे म्हणून सांगा नाहीतर, आत येऊन ठोकले असते', असा दम ( Bacchu Kadu Threat Hemant Deshmukh ) बच्चू कडू यांनी हेंमत देशमुख यांना दिला.
काय आहे प्रकरण -
अकोला जिल्ह्यातील पंचशील टिचर्स सोसायटी अंतर्गत येत असलेल्या बाळापूर येथील कला व वाणिज्य व महाविद्यालय येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, ही मागणी उपोषण करणाऱ्या संचालक मंडळाची आहे. कारण १९८७ पासून १७ सप्टेंबर २०२० पर्यंत संस्थेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता दिवंगत हरिभाऊ पुंडकर आणि त्यांचे पुत्र धर्यवर्धन पुंडकर बेकायदेशीर निर्णय घेत असल्याचा आरोप संचालक मंडळातील सदस्यांनी केला आहे. धर्यवर्धन पुंडकर हे संस्थेचे सचिव नसताना बनवाट सचिव म्हणून खोटे ठराव घेत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे. त्या विरोधात हे उपोषण सुरू आहे.
हेही वाचा - Anil Deshmukh in Jail : अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार