ETV Bharat / city

तुम्ही सरकारचे कुत्रे आहात म्हणत बोंडेंनी अमरावती पोलीस निरीक्षकांशी घातला वाद

डॉ. अनिल बोंडे यांनी तुम्ही कुत्रे आहात असे म्हणतात पोलीस निरीक्षक चोरमोले यांनीही 'तुम्हीच कुत्रे आहात' असे ओरडून म्हटले.

Anil Bonde argued with police
Anil Bonde argued with police
author img

By

Published : Mar 12, 2021, 4:37 PM IST

Updated : Mar 12, 2021, 8:39 PM IST

अमरावती - परीक्षा रद्द झाल्याने शहरातील पंचवटी चौकात गुरुवारी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांसोबत माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची बाचाबाची झाली. डॉ. अनिल बोंडे यांनी तुम्ही सरकारचे कुत्रे आहात, असे म्हणताच पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी तुम्ही पण कुत्रे आहात, असे खडसावून म्हणतात दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

लाठीचार्ज झाल्यावर पोहोचले डॉ. अनिल बोंडे

पंचवटी चौकात रस्त्यावर ठिय्या देऊन बसलेल्या विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करताच खळबळ उडाली होती. पोलिसांनी पकडून आणत 35 ते 40 विद्यार्थ्यांना एका व्हॅनमध्ये कोंबले. यात युवक आणि युवती दोघांचाही समावेश होता. दरम्यान, याच वेळी राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे पंचवटी चौकात पोहोचले. कोरोनामुळे डॉ. बोंडे यांच्या तोंडाला मास्क असल्याने त्यांना आधी कोणी ओळखले नाही. डॉ. बोंडे यांनी पोलिसांच्या इतक्या साऱ्या गाड्या येथे उभ्या असताना युवक आणि युवतींना असे एकाच गाडीत कोंबून नेणे योग्य नाही. एकाच गाडीत इतक्या जणांना कोंबता? आता कोरोना होत नाही का, असा सवाल डॉ. अनिल बोंडे यांनी केल्यावर तणाव निर्माण झाला.

'आता कोरोना होत नाही का?'

काय करायचे आणि काय नाही हे पोलिसांना कळते. तुम्ही शिकवायची गरज नाही, असे पोलीस निरीक्षक चोरमोले यांनी डॉ. अनिल बोंडे यांना म्हणताच 'तुम्ही सरकारचे कुत्रे आहात'. असा गंभीर आरोप डॉ. अनिल बोंडे यांनी केला. डॉ. अनिल बोंडे यांनी तुम्ही कुत्रे आहात असे म्हणतात पोलीस निरीक्षक चोरमोले यांनीही 'तुम्हीच कुत्रे आहात' असे ओरडून म्हटले.

पोलीस आयुक्तांनी दिले सोडण्याचे आदेश

डॉ. बोंडे आणि चोरमोले एकमेकांवर आरोप करीत असताना चोरमोले यांनी 'घ्या यांना ताब्यात गाडीत बसवा' असे म्हणत 'मी तुम्हला ताब्यात घेतो आहे' असे डॉ. अनिल बोंडे यांना सांगत पोलिसांच्या गाडीत बसवले. दरम्यान, पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी विद्यार्थ्यांसह ताब्यात घेण्यात आलेल्या डॉ. बोंडे यांना सोडून देण्याचे आदेश दिलेत.

Last Updated : Mar 12, 2021, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.