ETV Bharat / city

विनोद तावडेंनी ज्या विद्यार्थ्याला म्हटले होते, झेपत नसेल तर शिकू नको; त्याने सुवर्ण पदक मिळवून दिले असे उत्तर - vinod tawade tongue slip

अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात जानेवारी महिन्यात माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे अमरावती येथे आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला असता त्याला अपमानित करणाऱ्या तावडेंचे त्यावेळी चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट अटकेचे आदेश देणाऱ्या तावडेंना विद्यार्थ्यांनी आज सडेतोड उत्तर देत संत गाडगे बाबा विद्यापीठात पहिले येऊन प्रत्युत्तर दिले आहे.

sant gadgebaba university, amravati
संत गाडगे बाबा विद्यापीठ
author img

By

Published : Dec 24, 2019, 12:41 PM IST

Updated : Dec 24, 2019, 5:56 PM IST

अमरावती - प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळावे हा त्याचा हक्क आहे. असे असतानाही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेत येत नाही, हे कटू सत्य आहे. चांगले शिक्षण मिळावे यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विचारणा करणाऱ्या विद्यार्थ्याला तावडेंनी अपमानित केले होते. त्या प्रसंगाचे चित्रीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश विनोद तावडे यांनी पोलिसांना दिले होते. मात्र, तेच दोन विद्यार्थी आता संत गाडगेबाबा विद्यापीठातून पत्रकारितेच्या पदवी परीक्षेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्याने विनोद तावडेंना दिले 'असे' उत्तर

अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात जानेवारी महिन्यात माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे अमरावती येथे आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय, असा प्रश्न प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने विचारला. मात्र, तावडे यांना तो प्रश्न चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यावर त्या विद्यार्थ्याला अपेक्षित उत्तर देण्याऐवजी तावडे यांनी विद्यार्थ्याला 'तुला झेपत नसेल तर शिक्षण सोडून दे अणि नोकरी कर', असे उत्तर दिले होते. आणि त्याच वर्गातील दोन विद्यार्थी त्या प्रसंगांचे चित्रीकरण करत होते. त्या विद्यार्थ्यांना तावडेंनी थेट अटक करण्याचेच आदेश दिले होते. विद्यार्थ्यांना अपमानित करणाऱ्या तावडेंना आज प्रशांत आणि युवराज या दोन विद्यार्थ्यांनी अमरावती विद्यापीठातून पत्रकारितेच्या पदवी परीक्षेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उत्तर दिले आहे. त्यानंतर त्यांनी तावडेंवर थेट हल्ला चढवत आम्ही शिकलो आणि परत आलो. पण तावडे साहेब तुम्ही मात्र घरी गेलात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचा - नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून विद्यार्थिनीने नाकारले सुवर्णपदक!

पत्रकारितेत शिकणारे हे विद्यार्थी या प्रश्नोत्तराचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करत होते. ही बाब लक्षात येताच तावडे यांनी चित्रीकरण बंद करण्यास सांगून झालेले चित्रणही डिलीट करा असे सांगितले. परंतु, युवराज दाभाडे या विद्यार्थ्याने न घाबरता रेकॉर्डिंग सुरूच ठेवले होते. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आले. तथापि, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असे ठामपणे सांगत युवराजने शूटिंग सुरूच ठेवले. या प्रकारामुळे संतापलेल्या तावडे यांनी या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी लगेच युवराजला वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. विद्यार्थ्यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला होता.

हेही वाचा - बारावीमध्ये 51 टक्के गुण मिळवणारा प्रसाद बनला 'न्यायाधीश'

विनोद तावडेंनी विद्यार्थ्यांना दिलेले अजब उत्तर व त्यानंतर याच विद्यार्थ्याला दिलेले अटकेचे आदेश यामुळे हा प्रश्न महाराष्ट्रात चांगलाच पेटला होता.त्यासाठी राज्यभरात विविध विद्यार्थी संघटनानी या घटनेचा निषेध नोंदवत विनोद तावडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. परंतु, विनोद तावडे यांच्यावर सरकारने कुठलीही कारवाई केली नाही. मात्र, ज्या विद्यार्थ्यांनी माजी शिक्षण मंत्री तावडे यांना प्रश्न विचारला होता. शेतकरी कुटुंबातील तेच विद्यार्थी आज अमरावती विद्यापीठातून उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Intro:माजी शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी पोलिसांना अटकेचे आदेश दिलेले अमरावतीतील ते  दोन विद्यार्थी मेरिट.

पत्रकारिता अभ्यासक्रमात उत्सुग भरारी.
--------------------------------------------------------
स्पेशल पॅकेज स्टोरी करावी.

अमरावती अँकर 
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.हे शिक्षण रूपी दूध जर प्राशन केले तर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही.असा मोलाचा सल्ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला परन्तु आजही आर्थिक परिस्थिती नसल्याने मुळे कितीतरी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेत येत नाही हे कटू सत्य आहे.ही परिस्थिती लक्षात घेऊन माजी शिक्षण मंत्री यांना आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय? असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर, असे अफलातून उत्तर माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावतीं येथील शिवाजि महाविद्यालयाच्या पत्रकारितेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले होते .तेव्हा विनोद तावडे यांची शुटिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांला अटक करण्याचे आदेश विनोद तावडे यांनी पोलिसांना दिले होते.मात्र तेच दोन विद्यार्थी आता संत गाडगे बाबा विद्यापीठातून पत्रकारितेच्या पदवी मध्ये गुणानुक्रमे मेरिट आले आहे.पाहूया एक स्पेशल रिपोर्ट.

व्हिओ 1:-
अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात जानेवारी महिन्यात माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे  अमरावती येथे आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय?असे प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला. मात्र तावडे यांना तो प्रश्न चांगलाच जिव्हारी लागला होता.त्यावर विद्यार्थ्यांना अपेक्षित उत्तर देण्याऐवजी तावडे यांनी विद्यार्थ्यांला तुला झेपत नसेल तर शिक्षण सोडून दे अणि  नोकरी कर असे उत्तर त्या विद्यार्थाला दिले होते. परन्तु आज तेच विद्यार्थी प्रशांत आणि युवराज अमरावती   विद्यापीठातून पत्रकारितेच्या पदवी मध्ये मेरिट आले आणि  त्यानी तावडेना थेट प्रतिउत्तर दिले आम्ही शिकलो पण आलो तावडे साहेब तुम्ही घरी गेले

बाईट:- प्रशांत राठोड मेरिट विद्यार्थी 

व्हीओ 2: 
पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या प्रश्नोत्तराचे मोबाइलमध्ये शूटिंग करत होते. ही बाब लक्षात येताच तावडे यांनी शूटिंग बंद करण्यास आणि झालेले चित्रण डिलीट करण्याचे आदेश दिले. परंतु युवराज दाभाडे या विद्यार्थ्याचे न घाबरता रेकॉर्डिंग सुरूच होते. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आले; तथापि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असे ठामपणे सांगत युवराजने शूटिंग सुरूच ठेवले. या प्रकारामुळे संतापलेल्या तावडे यांनी, या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी लगेच युवराजला वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. विद्यार्थ्यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला

बाईट:- युवराज दाभाडे-स्वेटर घातलेला

व्हिओ3:-
विनोद तावडेंनी विद्यार्थ्यांना दिलेले अजब उत्तर व त्यानंतर याच विद्यार्थ्यांला दिलेले अटकेचे आदेश यामुळे हा प्रश्न महाराष्ट्रात चांगलाच पेटला होता.त्यासाठी राज्यभरात विविध विद्यार्थी संघटनानी या घटनेचा निषेध नोंदवत विनोद तावडे यांच्यावर कारवाई ची मागणी केली होती.परन्तु विनोद तावडे यांच्या वर सरकार ने कुठलीही कारवाई केली नाही.मात्र ज्या विद्यार्थ्यांनी माझी शिक्षण मंत्री तावडे यांना प्रश्न विचारला होता  शेतकरी कुटुंबातील तेच विद्यार्थी आज अमरावती विद्यापीठातून गुणानुक्रमे मेरिट आल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

स्वप्नील उमप etv भारत अमरावती*Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Dec 24, 2019, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.