ETV Bharat / city

Amravati Cotton to Fashion project : महिलांनी महिलांसाठी चालविला देशातील पहिला फॅशन प्रकल्प - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ

"खेड्याकडे चला" या महात्मा गांधींच्या संदेशाचे पालन करत अमरावती जिल्ह्यातील महिलांनी "कापूस ते फॅशन" असा प्रवास कसा सार्थ होऊ शकतो हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. ( Women implement the Cotton to Fashion project ) एवढेच नव्हे तर अशा प्रकारचा संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी चालविला असा हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 300 महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे

Amravati Cotton to Fashion project
अमरावती जिल्ह्यातील महिलांनी कापूस ते फॅशन असा प्रकल्प राबवित आहे.
author img

By

Published : Oct 7, 2022, 4:34 PM IST

Updated : Oct 7, 2022, 5:40 PM IST

अमरावती : खेड्याकडे चला या महात्मा गांधींच्या संदेशाचे पालन करत अमरावती जिल्ह्यातील महिलांनी "कापूस ते फॅशन" असा प्रवास कसा सार्थ होऊ शकतो हे त्यांच्या कृतीतून सिध्द केलं आहे. ( Women implement the Cotton to Fashion project ) एवढेच नव्हे तर अशा प्रकारचा संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी चालविला असा हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 300 महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.

देशातील पहिला फॅशन प्रकल्प

आदिवासी महिला करतात सुत कताई - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ( Maharashtra State Khadi and Village Industries Board ) अमरावती जिल्ह्यात मागील पाच वर्षापासून विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रम ( Solar Charkha Group Program ) हा नाविन्यपुर्ण पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील २१ गावामध्ये २५० महीलांना सोलर चरखे उपलब्ध करून देण्यात आले आहे. कस्तुरबा सोलर खादी महिला समितीमार्फत (Kasturba Solar Khadi Women's Committee )अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यापासून कापूस खरेदी करून त्यापासून कच्चा माल तयार करतात. विविध गावातील चरख्यावर सुत कताई करून त्यापासून सौर खादी कापड व विविध सौर खादी उत्पादनाची निर्मिती केली जाते. डाईंग, ब्लिचिंग, कॅलेंडरिंग, ब्लॉक प्रिंटिंग, यासह विविध प्रकारचे कपड्यावर प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी केली जाते.

देशातील एकमेव प्रकल्प - संपूर्णतः महिलांनी महिलांसाठी राबविण्यात आलेला हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये अमरावती जिल्हातील ३०० पेक्ष्या जास्त महीलांना कायम स्वरूपी रोजगार प्राप्त झाला असून हा प्रकल्प पूर्णतः सामाजिक भावनेतून ना नफा ना तोटा या तत्वावर राबविण्यात येत आहे. त्यामध्ये अमरावती जिल्हयातील धारणी तालुक्यातील १०० आदिवासी महिलांचा समावेश आहे. तसेच धारणी तालुक्यातील मांडू या गावी विणकाम केंद्र स्थापन केले असून तेथील १५ पेक्षा जास्त युवक - युवतीना उदरनिर्वाहाकरिता कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा संस्थेचा उद्देश आहे .

शासनानातर्फे आर्थिक साहाय्य उपलब्ध - या प्रकल्पाअंतर्गत राज्य शासन उद्योग विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमा अंतर्गत अमरावती एम आय डी सी येथे सामुहिक सुविधा स्थापन केले असून या सामुहिक सुविधा केंद्रामध्ये ८०% शासनाचा सहभाग आहे.या वस्त्रांची होते निर्मिती
लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे, पुरुषांचे शर्ट, जॅकेट दूपट्टा, टॉवेल्स तर महिलांच्या वस्त्रामध्ये पंजाबी सूट, साड्या, स्कार्फ ओढणी यासह इतरही विविध प्रकारचे कपडे येथे तयार होतात.

Last Updated : Oct 7, 2022, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.