ETV Bharat / city

राहुल गांधी ईडी चौकशी प्रकरण; अमरावतीत काँग्रेसचे भाजप कार्यालयावर आंदोलन, पोलिासांचा बंदोबस्त - Rahul Gandhi ED Inquiry

नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार ( National Herald Case ) प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून ( Rahul Gandhi ED Inquiry ) चौकशी सुरू असल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्यावतीने अमरावती ( Congress Agitation In Amravati ) शहर भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

Amravati Congress Agitation At BJP Office

author img

By

Published : Jun 18, 2022, 3:39 PM IST

अमरावती - नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार ( National Herald Case ) प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून ( Rahul Gandhi ED Inquiry ) चौकशी सुरू असल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेसच्यावतीने अमरावती ( Congress Agitation In Amravati ) शहर भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. भाजप कार्यालयाकडे निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी राजकमल चौकात ताब्यात घेतले.

भाजप कार्यालयावर पोलिसांचा बंदोबस्त - काँग्रेसच्यावतीने आज भाजप कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच भाजप कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. राजापेठ उड्डाणपुलाच्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. उड्डाणपुलावरदेखील पोलीस तैनात करण्यात आले होते.

काँग्रेसची भूमिका चुकीची - काँग्रेसचे मुखपत्र असणाऱ्या नॅशनल हेरॉल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राहूल गांधी यांची चौकशी सुरू आहे. या चौकशी बाबत काँग्रेसला आक्षेप असेल तर त्यांनी न्यायालयात जायला हवे. आंदोलनच करायचे असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस आयुक्तालय अथवा शहरातील राजकमल चौक येथे काँग्रेसने आंदोलन करणे अपेक्षित आहे. मात्र, थेट भाजपच्या कार्यालयावरच चालून येणाची काँग्रेसची भूमिका ही चुकीची असून आम्ही सुद्धा भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांची सकाळी दहा वाजल्यापासून वाट पाहतो आहे. आता दुपारचे दीड वाजला असून देखील काँग्रेस कार्यकर्त्यांचा कुठेही पत्ता नाही, असे भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातुरकर म्हणाले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - काँग्रेसच्यावतीने भाजपच्या शहर कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याने शहरातील राजकमल चौकासह राजापेठ चौक तसेच भाजपच्या शहर कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. उड्डाण पुलावर देखील पोलीस तैनात असून काँग्रेस कार्यकर्त्यांना उड्डाणपुलावरून जाण्यास रोखण्याची तयारी देखील पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा - Anti Agnipath Protest : अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात उद्रेक, ठिकठिकाणी जाळपोळ, तोडफोड आंदोलने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.