अहमदनगर - श्रीरामपूर येथील एका पत्रकार परिषदेत शुक्रवारी चांगलेच नाट्य पहायला मिळाले. नेहमीच आपल्या संयमाने सर्वांना चकित करणाऱ्या शरद पवारांचा संयम एका पत्रकाराच्या प्रश्नावर सुटला. इतकेच नाही तर ते पत्रकार परिषद सोडून निघालेही होते.
2014 ला मोदी लाटेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची धूळधाण झालीच होती, तरीही 2019 च्या लोकसभेत उभारी घेऊन सर्व विरोधी पक्ष मैदानात उतरले होते. मात्र निकाल आले आणि विरोधकांचे उरलेसुरले अवसान नाहीसे झाले.
हेही वाचा... तुम्ही माफी मागा मग बोला...पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवार भडकले
2019 पासून आपल्या वैयक्तिक भवितव्याची काळजी घेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातून सुरू झालेल्या गळतीला आवर घालणे ना काँग्रेसला जमत आहे ना राजकारणातले धुरंदर समजल्या जाणाऱ्या शरद पवार यांना. त्यांना सोडून सुरुवातीला दूरचे गेले, नंतर पिचडांसारखे अगदी जवळचे गेले आणि आता तर नात्यातलेही लोक पक्षापासून दूर जात आहेत. तरीही राष्ट्रवादीचा गाडा यशस्वीपणे हाकणारे पवारसाहेब या उतारवयात जवळच्याच लोकांकडून येत असलेल्या अनुभवामुळे हताश, निराश झालेत की काय? असेच त्यांच्या चिडलेल्या वक्तव्यावरून म्हणावे लागेल...
हेही वाचा... शरद पवारांवर नाराज होऊन नाही, तर 'या' कारणांमुळे नेते पक्ष सोडत आहेत - सुप्रिया सुळे
सध्या राज्यात विधानसभा तोंडावर आहे. राष्ट्रवादीचे अनेक बिनीचे शिलेदार पक्ष सोडून जात आहेत. पक्ष बदलण्याच्या या वादळात अजूनही काही शिलेदार पक्ष सोडून जातील असेच चित्र आहे. या परस्थितीत ज्यांना आयुष्यभर पद, मानसन्मान दिलेले, तेच आज गरजेच्या काळात दूर जात असताना, हेचि फळ काय मम तपाला..? असे शरद पवारांना वाटत असावे का? हा प्रश्न आहे.
हेही वाचा... काश्मीरमध्ये जाऊन गुंतवणुक करण्याची घाई कशाला ? शरद पवारांचा राज्य सरकारला टोला