ETV Bharat / city

Cotton Production : शेतकऱ्यांनो तग धरा; यावर्षी कापूस वाढवणार समृद्धी, कृषी तज्ञ सुधीर भोंगळेंचा विश्वास - Shivaji College of Agriculture

Amaravati Farmers: कापसाची मोठ्या प्रमाणात निर्यात करणारे पाकिस्तान, चीन, ऑस्ट्रेलिया अशा महत्त्वाच्या देशांमध्ये यावर्षी कापूस उपलब्ध नाही. Amaravati Farmers त्यामुळे आता ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये पावसामुळे कापसाला भाव येणार नाही. अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असली, तरी डिसेंबर महिन्यात दहा ते साडेदहा हजार हा भाव कापसाला हमखास मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तग धरावा असा सल्ला प्रख्यात कृषी तज्ञ सुधीर भोंगळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Amaravati Farmers
Amaravati Farmers
author img

By

Published : Oct 13, 2022, 3:55 PM IST

अमरावती कापसाची मोठ्या प्रमाणात निर्यात करणारे पाकिस्तान, चीन, ऑस्ट्रेलिया अशा महत्त्वाच्या देशांमध्ये यावर्षी कापूस उपलब्ध नाही. Amaravati Farmers त्यामुळे आता ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये पावसामुळे कापसाला भाव येणार नाही. अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असली, तरी डिसेंबर महिन्यात दहा ते साडेदहा हजार हा भाव कापसाला हमखास मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तग धरावा असा सल्ला प्रख्यात कृषी तज्ञ सुधीर भोंगळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शिवाजी कृषी महाविद्यालय Shivaji College of Agriculture येथे आयोजित शेतकरी कार्यशाळेच्या निमित्ताने ते अमरावतीत आले असताना सध्याच्या कापूस परिस्थिती संदर्भात त्यांनी ईटीव्ही भारतशी खास संवाद साधला आहे.

कृषी तज्ञ सुधीर भोंगळेंचा विश्वास

फवारणी न करताच गुलाबी बोंड अळीचा निप्पात कापसामध्ये जे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच शिवाजी कृषी महाविद्यालय आणि ऍग्रो व्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्तवतीने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ऍग्रो व्हिजन फाउंडेशनच्या वतीने आम्ही 2 प्रकल्प राबवित आहोत. त्यातील एका प्रकल्पाचे नाव प्रोजेक्ट बंधन असे आहे. या प्रकल्पांतर्गत गुलाबी बोंड अळीचा जो प्रश्न विदर्भात निर्माण झाला. त्या समस्येवर कुठलीही फवारणी न करता बोंड अळीचा निपात कसा करता येईल. यासाठी अमरावती जिल्ह्यात 60 एकरचे क्लस्टर विकसित केले आहे. अशा स्वरूपाचे आणखी 7 क्लस्टर विकसित केले जाणार आहे.

औषधींच्या फवारण्यांचा मारा करू नये या क्लस्टरची माहिती देण्यासाठी शेतकरी मेळावे घेतले जातील. आज अमरावतीत शेतकरी मेळावा घेण्याचा हाच उद्देश आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीला घाबरू नये आणि त्यावर औषधींच्या फवारण्यांचा मारा करू नये. विनाकारांचे पैसे फवारणीवर करण्याची गरज नाही. फवारणी न करता गुलाबी बोंड अळीचा नायनाट कसा करता येईल, याची माहिती आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत असे सुधीर भोंगळे म्हणाले आहेत.

क्रोप्टेक कॉटनचा होणार लाभ कापसाला खत देण्याचे प्रमाण पूर्णतः ढासळले आहे. कापसाचे हवे तसे पोषण केले जात नाही, ही वास्तविकता आहे. बोरॉन, सल्फर, मॅग्नेशियम, आयरन याचा फारसा वापर न करता शेतकरी पारंपारिक पद्धतीचे खत कापसासाठी वापरतात. यामुळे आम्ही कापसाला सर्व पोषक घटक मिळावे. यासाठी क्राफ्टेक कॉटन हे नवीन तंत्रज्ञान आणले आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका दाण्यामध्ये सात ते आठ पोषक घटक असून हे महत्त्वपूर्ण खत कापसाला दिले, तर इतर कुठल्याही खतांची गरज भासणार नाही. याचे प्रात्यक्षिक देखील कृषी महाविद्यालयात आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. उत्कृष्ट दर्जाचा कापूस निर्माण व्हावा. यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत व्हावे, हाच आमचा खरा उद्देश असल्याचे सुधीर भोंगळे म्हणाले.

विदर्भात यावर्षी देखील भरीव उत्पादन यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र आता पाऊस थांबताच अनेक शेतांमध्ये कापूस चांगल्या प्रकारे तग धरून असल्याचे मला विदर्भातील अनेक शेतांमध्ये फिरताना आढळून आले आहे. विदर्भात यावर्षी देखील कापसाचे चांगले उत्पादन होणार, अशी मला खात्री असल्याचा विश्वास सुधीर भोंगळे यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.