ETV Bharat / city

अभिनेता शिव ठाकरे कार अपघातातून सुखरुप बचावला - बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे

अमरावती शहरापासून जवळच असणाऱ्या वायगाव येथील सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी मी बहीण, मेव्हणा आणि सात महिन्याच्या भाचीसह 20 नोव्हेंबरला निघालो असताना वलगाव लगत आमच्या कारला एका टेम्पो ट्रॅव्हलने मागून धडक दिली होती. माझा अपघात झाल्याची बातमी सर्वत्र पसरली असताना अनेक जवळचे मंडळी आणि चाहत्यांकडून माझी सतत चौकशी केली जात आहे. मात्र काळजी करण्यासारखे काहीही नाही, मी सुखरूप आहे. बाप्पांनी मला वाचवलं, असे अभिनेता शिव ठाकरेने सांगितले.

अभिनेता शिव ठाकरे
अभिनेता शिव ठाकरे
author img

By

Published : Nov 23, 2021, 10:58 PM IST

अमरावती - अमरावती शहरापासून जवळच असणाऱ्या वायगाव येथील सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी मी बहीण, मेव्हणा आणि सात महिन्याच्या भाचीसह 20 नोव्हेंबरला निघालो असताना वलगाव लगत आमच्या कारला एका टेम्पो ट्रॅव्हलने मागून धडक दिली होती. माझा अपघात झाल्याची बातमी सर्वत्र पसरली असताना अनेक जवळचे मंडळी आणि चाहत्यांकडून माझी सतत चौकशी केली जात आहे. मात्र काळजी करण्यासारखे काहीही नाही, मी सुखरूप आहे. बाप्पांनी मला वाचवलं, असे बिग बॉस मराठी 2 चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाला.

अभिनेता शिव ठाकरे

शिव ठाकरेची गाडी शेतात जाऊन कोसळली

अमरावती शहरापासून काही अंतरावर वडगाव लागत मागून येणाऱ्या टेम्पो ट्रकने शिव ठाकरे यांच्या कारला धडक दिली. अपघातात शिव ठाकरे यांची कार रस्त्यालगत असणार्‍या शेतात जाऊन कोसळली. या शेतात केवळ काळी माती असल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी शिव ठाकरे यांच्या सोबत त्यांची बहीण, मेव्हणा आणि सात महिन्याची भाची होती. या अपघातात शिव ठाकरेसोबत कारमध्ये असणाऱ्या तिघांनाही मुका मार बसला मात्र सर्वेच सुखरूप आहेत.

शिव ठाकरेच्या उजव्या डोळ्याच्यावर दुखापत

या अपघातात शिव ठाकरेच्या उजव्या डोळ्यावर दुखापत झाली. अपघातानंतर लगेचच त्यांनी डॉक्टर शहा यांच्याकडे उपचार घेतला. डॉक्टरांनी डोळ्याच्या वर झालेल्या जखमेवर चार टाके मारले आहेत. मात्र कुठलीही काळजी करण्यासारखे नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या जखमेवरची आता पट्टी काढल्यावर काही जखम वगैरे झाली असेल जाणवणार सुद्धा नाही, असे डॉक्टरांनी मला सांगितल्याचे शिव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - 'ajinkya' Movie : देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित ‘अजिंक्य’ चित्रपटाला Im Dbवर १० पैकी १० रेटिंग्ज!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.