अमरावती संपूर्ण देशात गणपती बापाच्या आगमनाची तयारी जोरात Ganesh Chaturthi 2022 सुरू आहे. छोट्या पासून मोठ्यांपर्यंत सगळेच गणपतीच्या उत्सवात रंगून जाण्यासाठी तयार झाले आहेत. उद्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातच गणेश भक्तांनी गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली आहे. अशातच बालगोपाल काही कमी नाहीत. त्यांनी पण आपल्या लाडक्या बापाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. दर्यापूर येथील सहजीवन कॉलनी येथील रहिवासी असलेली कु. क्षिती दत्तात्रय रेवस्कर हिने तर बाप्पाच्या आगमनाची तयारी दर्शवणारी ६x ७ बफूट आकाराची भव्य सुबक रांगोळी Beautiful Rangoli काढली आहे.
लहानपणापासून रांगोळी ची आवड
गणपती बाप्पाची ही रांगोळी काढायला क्षिती ला जवळपास १४ ते १५ तास लागले असल्याचे तिने सांगितले. मागील वर्षे सुद्धा गणपती उत्सवात या निमित्ताने तिने दहा दिवस वेगळ्या रूपात गणपती बाप्पा रेखाटले होते. तिच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा Ganeshotsav 2022: नवसाला पावणारा औरंगाबादचा जागृत गणपती
हेही वाचा Ganesh Chaturthi 2022 अष्टविनायकांमधील प्रत्येक गणपतीची आहेत वेगवेगळी वैशिष्ट्ये