अकोला - मलकापुरातील एका बंगल्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. एटीएसचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी ही कारवाई केली.
शहरातील मलकापूर येथील सनसिटी परिसरातील एका बंगल्यात आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती दहशतवादी पोलीस पथकाला (एटीएस) मिळाली. त्यानंतर पोलिसांनी येथे छापा मारला. आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असताना ५ जणांना ताब्यात घेण्यात आले. सुधीर सावंत, शाम हेडा असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी कारवाईत मोबाइल, लॅपटॉप आणि एलईडी टीव्ही असा एकत्रित लाखो रुपयांचा मुद्देमाल केला.