नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे गवार व मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. शेवग्याच्या शेंगाच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. (APMC market Navi Mumbai )
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १६०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये.
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३६०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये.
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये.