मुंबई UPI Payment Limit : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा वाढवली. आता यूपीआय द्वारे एका वेळेस ५ लाख रुपयांची पेमेंट करणं शक्य होणार आहे. मात्र केवळ रुग्णालयांमध्ये उपचार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी यूपीआय पेमंटची मर्यादा एक लाख रुपयांची होती.
पेमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये : द्विमासिक चलनविषयक धोरणाचा आढावा सादर करताना रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी सांगितलं की, रुग्णालयं आणि शैक्षणिक संस्थांसाठी UPI द्वारे पेमेंटची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात लवकरच स्वतंत्र सूचना जारी केली जाईल.
सरसकट मर्यादा वाढवली का : येथे हे लक्षात घेण्यासारखं आहे की, काही कॅटेगरी वगळता, UPI द्वारे पेमेंटची मर्यादा १ लाख रुपये कायम आहे. ज्या कॅटेगरीमध्ये आधीच सूट देण्यात आली आहे त्यात भांडवली बाजार (मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, ब्रोकिंग, म्युच्युअल फंड इ.), क्रेडिट कार्ड पेमेंट, कर्ज परतावा, ईएमआय, विमा इत्यादींचा समावेश आहे. या बाबींसाठी UPI द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा २ लाख रुपये आहे.
RDS आणि IPO साठी मर्यादा किती : रिटेल डायरेक्ट स्कीम (RDS) आणि IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) साठी अर्जांसाठी केंद्रीय बँकेनं यापूर्वी UPI अंतर्गत पेमेंट मर्यादा ५ लाख रुपये केली होती. RBI च्या रिटेल डायरेक्ट स्कीम अंतर्गत, वैयक्तिक गुंतवणूकदारांना मध्यस्थांशिवाय सरकारी रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.
हेही वाचा :