ETV Bharat / business

Share Market Update : अमेरिका-जपानच्या बाजारातील चांगल्या ट्रेंडसह सुरुवातीच्या व्यापारात तेजी

author img

By

Published : Feb 24, 2023, 12:04 PM IST

आज बीएसई आणि एनएसई दोन्ही निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात वाढले होते. गेल्या ट्रेडिंग सत्रात, आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड तेल (ब्रेंट क्रूड) 0.77 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 82.84 डॉलर किमतीवर होते.

Share Market
शेयर बाजार

मुंबई : अमेरिकेच्या बाजारातील सकारात्मक कल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झालेली खरेदी यामुळे प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात वधारले. या कालावधीत बीएसई सेन्सेक्स 297.25 अंकांनी वर चढून 59,903.05 अंकांवर पोहोचला, तर एनएसई निफ्टी 88.5 अंकांनी वाढून 17,599.75 अंकांवर पोहोचला. तर डॉलरच्या तुलनेत रुपया पाच पैशांनी घसरून 82.69 वर आला.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ : बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, मारुती आणि आयटीसीचे शेअर्स घसरले आहेत. आशियाई बाजारात दक्षिण कोरिया, चीन आणि हाँगकाँग तोट्यात तर जपान नफ्यात व्यवहार करत होते.

अमेरिकन बाजारात तेजी : गुरुवारीही अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले. गुरुवारी मागील व्यापार सत्रात, बीएसई सेन्सेक्स 139.18 अंकांनी किंवा 0.23 टक्क्यांनी घसरून 59,605.80 वर बंद झाला. त्याच वेळी, एनएसई निफ्टी 43.05 अंकांनी किंवा 0.25 टक्क्यांनी घसरून 17,511.25 वर बंद झाला. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड तेल (ब्रेंट क्रूड) 0.77 टक्क्यांच्या वाढीसह प्रति बॅरल 82.84 डॉलरच्या किमतीवर होते. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) गुरुवारी 1,417.24 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर : नाशिकमध्ये पेट्रोलचा भाव 106 रुपये 24 पैसे, तर डिझेलचा भाव 92 रुपये 76 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव 106 रुपये 31 पैसे भाव आहे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 एवढा पैसे आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोल 106 रुपये 21 पैसे तर डिझेल 92 रुपये 75 पैसे एवढा दर आहे. यवतमाळमध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 49 पैसे असून डिझेलचा दर 93 रुपये 4 पैसे आहे. पुण्यात पेट्रोलचा भाव 106 रुपये 54 पैसे तर डिझेलचा भाव 93 रुपये 4 पैसे आहे.

आजचे सोन्या-चांदीचे दर : आज 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 5,200 रुपये तर 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 5,673 रुपये आहे. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,000 रुपये, चेन्नईत 52,750 रुपये, दिल्लीत 52,150 रुपये, कोलकातात 52,000 रुपये तर हैदराबाद मध्ये 52,000 रुपये आहे. मुंबईत 10 ग्रॅम चांदीचे दर 688 रुपये, चेन्नईमध्ये 720 रुपये, दिल्लीत 688 रुपये, कोलकातात 688 रुपये, बंगळुरूत 720 रुपये आणि हैदराबादमध्ये 720 रुपये आहे.

हेही वाचा : Elon Musk Tesla : एलन मस्क टेस्लात चार वर्षांपासून बिनपगारी, तरीही अशा पद्धतीने करतो अब्जावधींची कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.