मुंबई: जागतिक बाजारातील तेजी आणि विदेशी निधीचा सतत ओघ यामुळे आज देशातील प्रमुख शेअर निर्देशांक असलेले सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेजीत दिसून आले आहेत. यादरम्यान बीएसई सेन्सेक्स ३७९.१५ अंकांनी वाढून ६१,६५४.२४ वर पोहोचला. NSE निफ्टी 108.25 अंकांनी वाढून 18,124.10 वर व्यवहार करत होता. काल शेअर बाजारात तेजी नसल्याने नकारात्मक वातावरण होते.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले: टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स आणि एचडीएफसी बँक या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स आज सुरुवातीच्या व्यवहारात वधारले आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समधील सर्व कंपन्या हिरव्या रंगात व्यवहार करत होत्या. म्हणजेच अनेक शेअर्स तेजीत असल्याचे दिसून आले. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, बुधवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) 432.15 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.
जपान, चीन, हॉंगकॉंगचे बाजारही तेजीत: एकीकडे भारतातील शेअर बाजारात आज तेजीचे वातावरण असताना दुसरीकडे जपान, चीन आणि हॉंगकॉंग येथील शेअर बाजारातही तेजी असल्याचे दिसून येत आहे. सत्राच्या मध्यात जपान, चीन आणि हाँगकाँगचे बाजार तेजीसह व्यवहार करत होते. बुधवारी अमेरिकन बाजार तेजीने बंद झाले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.49 टक्क्यांनी वाढून 85.80 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.
डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी वाढला: डॉलरमध्ये व्यापक कमजोरी आणि देशांतर्गत इक्विटी बाजारातील मजबूती असल्याने गुरुवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी 82.6 वर वाढला. विदेशी मुद्रा वितरकांनी सांगितले की, देशांतर्गत व्यापार तूट आणि परकीय निधीच्या प्रवाहावरील मजबूत आकडेवारीने गुंतवणूकदारांच्या भावनांना चालना दिली. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 82.72 वर उघडला आणि नंतर त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 21 पैशांनी वाढून 82.62 वर पोहोचला.
कच्च्या तेलाचे भाव वाढले: बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८२.८३ वर बंद झाला होता. दरम्यान, सहा प्रमुख चलनांच्या बास्केटच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची स्थिती मोजणारा डॉलर निर्देशांक 0.25 टक्क्यांनी घसरून 103.66 वर आला होता. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.50 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $85.81 वर पोहोचले. शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी निव्वळ आधारावर 432.15 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.
हेही वाचा: Home Loan : गृहकर्जावरील वाढत्या कर्जाच्या ओझ्यावर मात करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा