मुंबई : जागतिक बाजारातील कमजोर ट्रेंडमुळे देशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी मजबूतीने उघडले. सेन्सेक्स आणि निफ्टीने सुरुवातीच्या व्यवहारात वाढ नोंदवली. या कालावधीत, बीएसई सेन्सेक्स 205.55 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी वाढून 58,443.40 अंकांवर पोहोचला. तर एनएसई निफ्टी 44 अंकांनी म्हणजेच 0.26 टक्क्यांनी वाढून 17,198.30 वर पोहचला. 30 शेअर्सवर आधारित सेन्सेक्सचे 20 शेअर्स नफ्यात तर 10 शेअर्स तोट्यात होते. टायटन, भारती एअरटेल आणि एल अँड टी यांचे शेअर्स नफ्यात व्यापार करत होते.
आशियाई बाजार तोट्यात : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक यांच्या अपयशामुळे मंगळवारी बहुतांश आशियाई बाजार तोट्यासह व्यवहार करत होते. सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्यात होते. 30 शेअर्सचा सेन्सेक्स 897.28 अंकांनी किंवा 1.52 टक्क्यांनी घसरून 58,237.85 वर बंद झाला, जी पाच महिन्यांतील सर्वात कमी पातळी आहे. सुरुवातीच्या व्यवहारात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 258.60 अंक किंवा 1.49 टक्क्यांनी घसरून 17,154.30 अंकांवर बंद झाला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 1,546.86 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी घसरून 82.27 वर पोहचला होता.
अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रात संकट : अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रात सध्या मोठे संकट आले आहे. अलिकडेच अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅली बँकेला (SVB) टाळे ठोकण्याची वेळी आली आहे. सिलिकॉन व्हॅली बॅंकेनंतर सोमवारी सिग्नेचर बँकही बंद झाली. सिलिकॉन व्हॅली बॅंक ही अमेरिकेतील 16 व्या क्रमांकाची कर्ज देणारी बॅंक आहे. यापूर्वी या बँकेने भांडवल उभारणीसाठी भरपूर प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना याश मिळाले नाही. या कालावधीत बँकेचे शेअर्स 70 टक्क्यांनी घसरले होते. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ने सांगितले की, ते सिलिकॉन व्हॅली बँकेच्या मालमत्तेची विक्री करतील ज्याचा फायदा लाभांश विमा नसलेल्या ठेवीदारांना होऊ शकतो.
हेही वाचा : US BANKING CRISIS : अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीनंतर आता सिग्नेचर बँक बंद, वाचा संपूर्ण प्रकरण