नवी दिल्ली : महामारीनंतर देशातील किरकोळ व्यवसाय पुन्हा रुळावर ( Retail businesses back on track ) आल्याचे दिसत आहे. जूनमध्ये किरकोळ व्यवसायाच्या विक्रीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने ( Retailers Association of India ) सोमवारी ही माहिती दिली. RAI ने म्हटले आहे की देशभरातील किरकोळ व्यवसायांच्या विक्रीत जून 2019 पूर्वीच्या किंवा जून 2019 च्या समान कालावधीच्या तुलनेत 13 टक्के वाढ ( 13 percent growth in retail business ) झाली आहे.
RAI ने एका निवेदनात म्हटले आहे की, जूनमधील विक्री महामारीपूर्वीच्या पातळीपेक्षा जास्त आहे, परंतु महिन्याचा दुसरा पंधरवडा समाधानकारक राहिला नाही. महागाईमुळे ग्राहकांच्या खर्चावर परिणाम झाला आहे. आगामी सणासुदीच्या हंगामातील विक्रीवरही महागाईचा परिणाम दिसून येईल. ताज्या RAI बिझनेस सर्व्हेनुसार ( Latest RAI Business Survey ), पूर्व भागातील रिटेल व्यवसायाने गेल्या महिन्यात सर्वाधिक वाढ नोंदवली. जून 2019 च्या तुलनेत या विभागाची विक्री 17 टक्क्यांनी वाढली आहे. त्यानंतर उत्तर विभागात 16 टक्के, पश्चिम विभागात 11 टक्के आणि दक्षिण विभागात नऊ टक्के वाढ झाली आहे.
सर्वेक्षणानुसार, जून 2022 मध्ये साथीच्या आजारापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत वाढ दिसून आली आहे, जरी वाढीचा दर निश्चितपणे मंदावला आहे. जूनचा दुसरा पंधरवडा उत्साहवर्धक राहिला नसल्याचे अनेक किरकोळ विक्रेते सांगतात. या काळात लग्न-समारंभाचा हंगाम नव्हता. सर्वेक्षणानुसार, जून 2019 च्या तुलनेत गेल्या महिन्यात क्रीडा वस्तूंच्या विक्रीत 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर ज्वेलरी 27 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि क्विक सर्व्हिस रेस्टॉरंटमध्ये 16 टक्के वाढ ( 16 percent growth quick service restaurants ) झाली. RAI ने म्हटले आहे की, 2019 च्या त्याच महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये परिधान, कपडे आणि पादत्राणे क्षेत्रातील विक्री 14-14 टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा - RBI restrictions : आरबीआयचे रायगड सहकारी बँकेवर निर्बंध!