ETV Bharat / business

Nirmala Sitharaman on Adani Row: अदानी प्रकरणावर केंद्र सरकारने सोडले मौन.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'यंत्रणा..' - निर्मला सीतारामन अदानी प्रकरण

अदानी समूह अडचणीत असताना केंद्र सरकारमार्फत मात्र कुठलीही भूमिका घेण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदानी समूहाबाबत वक्तव्य केलं आहे. यंत्रणा त्यांचे काम करतील असे त्या म्हणाल्या.

Nirmala Sitharaman on Adani Row
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अदानी प्रकरण
author img

By

Published : Feb 4, 2023, 2:59 PM IST

Updated : Feb 4, 2023, 3:36 PM IST

नवी दिल्ली: नियामक त्यांचे काम करतील. वास्तविक, बाजारपेठेचे नियमन मुख्य स्थितीत ठेवण्यासाठी, SEBI हा अधिकार आहे आणि ती मुख्य स्थिती अबाधित ठेवण्याचे साधन तिच्याकडे आहे, असं वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री एन सीतारामन यांनी केले. अदानी समूह अडचणीत असताना केंद्र सरकारमार्फत मात्र कुठलीही भूमिका घेण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदानी समूहाबाबत वक्तव्य केलं आहे. यंत्रणा त्यांचे काम करतील असे त्या म्हणाल्या.

नियमकांची यंत्रणा सरकारपासून स्वतंत्र: सीतारामन म्हणाल्या की, जे नियामक असतील ते त्यांचे काम करतील. आरबीआयने याबाबत आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्यापूर्वी, एलआयसीनेही अदानी समूहात असलेल्या गुंतवणुकीची माहिती सर्वांना सांगितली आहे. नियामक हे सरकारपासून स्वतंत्र अशी यंत्रणा आहेत. जे योग्य आहे ते करणे नियमकांवर सोडण्यात आले आहे. जेणेकरून बाजाराला चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येईल, असेही अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या.

भारताकडे ८ अब्ज डॉलर्सचे परकीय चलन: अदानी समूहाचा एफपीओ बाहेर पडल्याबाबत प्रश्न विचारला असता सीतारामन म्हणाल्या की, शेअर बाजारात FPO येतात आणि बाहेर पडतात. चढ-उतार प्रत्येक बाजारात आहेत. गेल्या काही दिवसांत आपल्याकडे 8 अब्ज डॉलर्सचे परकीय चलन राखीव आल्याची वस्तुस्थिती हे सिद्ध करते की भारताविषयीची धारणा आणि त्याची ताकद अबाधित आहे. असेही अर्थमंत्री यावेळी बोलताना म्हणाल्या. या देशातून किती वेळा एफपीओ काढले गेले नाहीत आणि त्यामुळे किती वेळा भारताची प्रतिमा खराब झाली आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. किती वेळा एफपीओ परत आले नाहीत?, असेही त्या म्हणाल्या.

मूडीजने कालच दिला इशारा: अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे समूहाच्या भांडवल उभारणीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने शुक्रवारी दिला. दुसरी एक रेटिंग एजन्सी असलेल्या फिचने म्हटले आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या रेटिंगवर अद्याप कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकन फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील गटावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणुकीत सहभाग असल्याचा उघड आरोप केला आहे. कंपनीच्या या आरोपानंतर समूह कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

हेही वाचा: SBI on Loan to Adani: अदानींचे वासे पोकळ असतील तर एसबीआयला लागणार तब्बल 27 हजार कोटींचा चुना, कसा ते वाचाच...

Last Updated : Feb 4, 2023, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.