मुंबई: Mahindra Finance: महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (एमएमएफएसएल) ला rbi on mahindra finance थर्ड पार्टी एजंट्सद्वारे कर्जाची वसुली किंवा मालमत्ता ताब्यात घेण्यावर रिजर्व्ह बँकेने बंदी घातली RBI directs Mahindra Finance loan recovery आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी सांगितले की, त्यांचा आदेश तात्काळ प्रभावाने लागू आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहील. झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेच्या (२७) मृत्यूनंतर आरबीआयचा निर्णय आला आहे, जिचा मागच्या आठवड्यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली रिकव्हरी एजंट्सने चिरडल्याने मृत्यू झाला होता.
मध्यवर्ती बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, MMFSL त्यांच्या कर्मचार्यांद्वारे कर्ज वसुली अथवा मालमत्ता ताब्यात घेण्याचे काम सुरु ठेऊ शकते. "भारतीय रिझर्व्ह बँकेने आज निर्देश दिले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MMFSL), मुंबई यांना आउटसोर्सिंग व्यवस्थेद्वारे कोणतीही वसुली किंवा ताब्यात घेण्याची क्रिया तात्काळ थांबवण्याचे," निवेदनात म्हटले आहे.
आरबीआयने म्हटले आहे की, ही कारवाई एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी) च्या आउटसोर्सिंग व्यवस्थेमध्ये आढळलेल्या पर्यवेक्षी चिंतांवर आधारित आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी महिंद्रा फायनान्स फर्म 'टीम लीज'चा कर्मचारी रोशनला अटक केली. महिंद्रा ग्रुपचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अनिश शहा यांनी महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.