मुंबई : बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवत असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या दरांवरही पडत असतो.
देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल दर : देशात सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज इंधन दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. भारतीय तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कायम असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
इंधनाच्या किंमती : इंधनाच्या किंमती आपल्याकडे का वाढत आहेत, याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढलेत आणि भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन आपण परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आहे. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर काय आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 76 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 26 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 17 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 68 पैसे आहे.