ETV Bharat / business

Economic Changes From 1 July: 1 जुलैपासून आर्थिकदृष्ट्या होत आहेत अनेक नवीन बदल; जाणून घ्या

author img

By

Published : Jun 28, 2022, 1:53 PM IST

Updated : Jun 28, 2022, 2:21 PM IST

1 जुलैपासून अनेक गोष्टींवर कर लागणार आहेत. आर्थिकदृष्ट्या अनेक बदल होणार ( changes in economy ) आहेत. चला तर मग 1 तारीय येण्याआधी या सर्व बदलांवर एक नजर टाकूयात.

Economic Changes
Economic Changes

नवी दिल्ली - जूनचा महिना संपत आला आहे. महिना संपायला फक्त दोनच दिवस उरले आहेत. प्रत्येक नवीन महिन्याची सुरुवात अनेक बदल घेऊन येते. त्याच प्रमाणे येणारा जुलै महिनाही बदल घेऊन येत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर खीशावर होईल. काह गोष्टींंत तुमचा खीसा कापला जाण्याची शक्यता आहे. १ जुलैपासून होत असलेल्या अशा बदलांवर एक नजर टाकूया.

1. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर टीडीएस आकारला जाणार- सरकारने क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर लावला ( 30 percent tax on cryptocurrency )आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून क्रिप्टो गुंतवणूकदारांना आणखी एक झटका बसणार आहे. 1 जुलैपासून गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या क्रिप्टो व्यवहारांवर 1 टक्के दराने TDS भरावा लागणार आहे. मग क्रिप्टो मालमत्ता नफा किंवा नुकसान झाल्यावर विकला गेला असेल त्यावर तुम्हाला 1 टक्के दराने TDS भरावा लागणार आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यास सोप होईल हा यामागचा हेतू असल्याच सांगण्यात येत आहे.

Economic Changes
Economic Changes

2. भेटवस्तूंवर 10 टक्के दराने कर - 1 जुलैपासून भेटवस्तूंवर 10 टक्के दराने कर ( 10 percent Tax on gifts ) देखील भरावा लागणार आहे. यात भेटवस्तू म्हणून मिळालेले मोफत औषधांचे नमुने, परदेशी विमान तिकीट किंवा मिळालेल्या इतर महागड्या भेटवस्तूंवर हा यांचा समावेश असेल. अनेक वेळा एखाद्यी कंपनी मार्केटिंगच्या उद्देशाने भेटवस्तू देते. किंवा डॉक्टर विविध प्रकारची औषधे ( फेशिअल क्रीम, कॉस्मेटीक, सिरम ) देतात . आता त्यांना त्यावरही कर भरावा लागणार आहे.

Economic Changes
Economic Changes

3. कामगार संहितेची अंमलबजावणी - जुलै महिना सुरू होताच कामगार संहितेचे नवीन नियम लागू ( Implementation of Labor Code) होण्याची शक्यता आहे. त्याच्या अंमलबजावणीमुळे, हातातील पगार, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा, पीएफ योगदान आणि ग्रॅच्युइटीवर परिणाम होणार आहे. अहवालानुसार, या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे कार्यलयातील कामाचे तास जास्तीत जास्त तास 12 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ४ दिवसांत ४८ तास म्हणजेच दररोज १२ तास काम करावे लागणार आहे. तथापि, हा नियम एका विशिष्ट राज्याने घालून दिलेल्या नियमांच्या आधारे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदलू शकतो.

Economic Changes
Economic Changes

4. एअर कंडिशनर महागणार - 1 जुलैपासून एअर कंडिशनर घेणे महाग होणार (Air conditioners will be expensive ) आहे. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (BEE) ने एअर कंडिशनर्ससाठी ऊर्जा रेटिंग नियम बदलले आहेत, जे 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहेत. त्यानुसार, पहिल्या जुलैपासून 5-स्टार एसीचे रेटिंग थेट 4-स्टारवर जाईल. नवीन ऊर्जा कार्यक्षमता मार्गदर्शक तत्त्वांसह, भारतातील एसीच्या किमती येणाऱ्या काळात 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.

Economic Changes
Economic Changes

5. आधार-पॅन कार्ड लिंक - पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला उशीर करू नका, कारण पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक ( Aadhaar-PAN card link) करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे. म्हणजेच तुमच्याकडे यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. यात जर तुम्ही हे काम 30 जून 2022 नंतर म्हणजे 1 जुलै किंवा त्यानंतर केले तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल. म्हणजेच, सध्या पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी ५०० रुपयांचा दंड भरावा लागतो. तो १ जुलैपासून वाढणार आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला १,००० रुपये दंड भरावा लागू शकतो.

Economic Changes
Economic Changes

6. डीमॅट खात्यासाठी केवायसी - जर तुम्ही अद्याप तुमच्या डीमॅट ट्रेडिंग खात्याचे केवायसी ( KYC for demat account) पूर्ण केले नसेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 30 जूनपर्यंत वेळ आहे. तुम्ही डीमॅट ट्रेडिंग खात्याचे केवायसी करू शकता. बाजार नियामक सेबीच्या म्हणण्यानुसार, डिमॅट खात्यात शेअर्स आणि सिक्युरिटीज ठेवण्यासाठी ही सुविधा दिली जाते. त्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Economic Changes
Economic Changes

7. गॅस सिलिंडरच्या किमती वाढणार? - सध्या गॅस सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलत जातात. अशा स्थितीत जुलैच्या पहिल्या दिवशीही त्यात बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या सर्व सामान्य जनतेला गॅसच्या वाढत्या किमतींनी मोठा झटका दिला आहे. त्यामुळे 1 जुलैपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Economic Changes
Economic Changes

हेही वाचा - भटक्या कुत्र्याने रुग्णालयातून पळवून नेले बाळ, आई झोपेत असताना घडला प्रकार

Last Updated : Jun 28, 2022, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.