नवी दिल्ली : 2023 सालचा दुसरा महिना फेब्रुवारी संपत आला आहे. त्याचवेळी मार्च महिना तोंडावर आला आहे. नवीन महिना सुरू होताच लोकांमध्ये सुट्यांची प्रचंड उत्सुकता असते. कार्यालये आणि बँकांना किती दिवस सुट्टी असेल हे सर्व कर्मचाऱ्यांना जाणून घ्यायचे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या आल्या आहेत. या महिन्यात होळी, नवरात्री ते रामनवमी असे सण साजरे होणार आहेत. अशा स्थितीत बँकांना कुलूपं लटकतील. बँकांना मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या येणार असल्याने बँकांच्या खातेदारांनी आवश्यक कामे पूर्ण करण्यापूर्वी एकदा बँकेच्या सुट्ट्यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केले कॅलेंडर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी करते. मार्च महिन्याच्या सुट्याही तोंडावर आल्या आहेत. याबाबत बोलायचे झाले तर महिनाभराच्या सरकारी सुट्ट्यांसह एकूण १२ दिवस बँकांना कुलूप लटकलेले राहणार आहेत. ही माहिती रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे.
मार्चमध्ये आहेत 'हे' सण : मार्च महिना आपल्यासोबत अनेक सुट्ट्या घेऊन येत आहे. होळी, गुढीपाडवा, उगादी, नवरात्री, रामनवमी हे सण मार्चच्या सुरुवातीला होतील. RBI ने राज्यांनुसार सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. याशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारी बँका बंद राहतील. ऑनलाइन सेवा सुरू राहणार : या दिवसांत सर्व बँका बंद राहणार असल्या तरी बँकांची ऑनलाइन सेवा २४ तास सुरू राहणार आहे. इंटरनेट बँकिंगमुळे खातेदारांचे कोणतेही काम सहज करता येते.
तारीख आणि बँक सुट्ट्यांचे कारण : ३ मार्च -चपचर कूट, ५ मार्च- रविवार साप्ताहिक सुट्टी, 7 मार्च- होलिका दहन, 8 मार्च- होळी, ९ मार्च- पाटण्यात होळीची सुट्टी, 11 मार्च- दुसरा शनिवार साप्ताहिक सुट्टी, 12 मार्च- दुसरा रविवार साप्ताहिक सुट्टी, मार्च १९- तिसरा रविवार साप्ताहिक सुट्टी, 22 मार्च- गुढी पाडवा, उगादी, बिहार दिवस, नवरात्रीचा पहिला दिवस, 25 मार्च- चौथा शनिवार साप्ताहिक सुट्टी, 26 मार्च- चौथा रविवार साप्ताहिक सुट्टी, मार्च ३०- राम नवमी.
फेब्रुवारीत बँका 10 दिवस बँका बंद: सध्या सुरु असलेला फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा आहे. चालू महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त महाशिवरात्रीसह अनेक प्रसंगी बँका बंद राहिल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या बँकांच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार १० दिवस बँका बंद होत्या.