ETV Bharat / business

Share Market Update : शेअर बाजारात तेजीचे वातावरण, सेन्सेक्स 53500 पार, निफ्टी 16000 च्या जवळ - बीएसई सेंसेक्स लाइव न्यूज

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी जागतिक संकेत मजबूत आहेत आणि आशियाई बाजारांमध्येही चांगली वाढ दिसून येत आहे, त्या आधारावर भारतीय शेअर बाजारातही उत्साह पाहायला मिळत ( Sensex and nifty Today ) आहे.

Share Market Update
शेअर बाजारात तेजीचे वातावरण
author img

By

Published : Jul 5, 2022, 12:54 PM IST

मुंबई: आशियाई बाजारातील सकारात्मक ट्रेंडमध्ये इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या बड्या समभागांच्या वाढीमुळे मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 328 अंकांनी वर गेला. यादरम्यान बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक ३२८ अंकांनी वाढून ५३,५६२.८३ वर पोहोचला. दुसरीकडे, NSE निफ्टी 99.7 अंकांनी वाढून 15,935.05 वर होता. पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, एनटीपीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सेन्सेक्समध्ये आघाडीवर ( Sensex and nifty Today ) होते.

आशियाई बाजारातही तेजी : आयटीसी आणि लार्सन अँड टुब्रो यांनी घसरण केली. इतर आशियाई बाजारांमध्ये टोकियो, सोल आणि हाँगकाँगमधील बाजार तेजीसह व्यवहार करत होते, तर शांघायमध्ये किरकोळ घसरण झाली. सुटीमुळे सोमवारी अमेरिकन बाजार बंद राहिले. मागील सत्रात सेन्सेक्स 326.84 अंकांनी किंवा 0.62 टक्क्यांनी वाढून 53,234.77 वर बंद झाला. निफ्टी 83.30 अंकांनी किंवा 0.53 टक्क्यांनी वाढून 15,835.35 वर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.01 टक्क्यांनी घसरून $113.49 प्रति बॅरलवर आले.

आजच्या चढत्या शेअर्समध्ये : टाटा मोटर्स 2.09 टक्के, हिंदाल्को 2.03 टक्के आणि पॉवरग्रुड 1.90 टक्क्यांच्या उसळीसह व्यवहार होत आहेत. बजाज फिनसर्व्ह 1.69 टक्के आणि NTPC 1.56 टक्के मजबूतीसह व्यवहार करत आहेत. सायंकाळपर्यंत ही तेजी राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : Todays Bitcoin Rates : बिटकॉइनच्या भावात थोडीशी वाढ.. इथेरिअमचेही भाव वाढले.. पहा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.