ETV Bharat / business

Gautam Adani Bloomberg Billionaires Index : उद्योगपती गौतम अदाणींना जोरदार झटका.. जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर - अदानी शेअर आजची किंमत

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालाचा परिणाम आता दिसून येत आहे. या अहवालामुळे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे गौतम अदानी यांचे ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समधील टॉप 10 च्या यादीतून नाव काढण्यात आले आहे. जाणून घ्या आता किती आहे त्यांची मालमत्ता.

Indian industrialist Gautam Adani out of top 10 in Bloomberg Billionaire Index
उद्योगपती गौतम अदाणींना जोरदार झटका.. जगातील टॉप १० अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर
author img

By

Published : Jan 31, 2023, 1:28 PM IST

नवी दिल्ली : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना धक्का बसला आहे. अदानी समूहाने 413 पानांच्या उत्तरात हिंडेनबर्गच्या अहवालाचे खंडन केले असले तरी, या अहवालाचा व्यवसाय आणि शेअर्सवर परिणाम प्रकर्षाने दिसून येत आहे. यामुळे गौतम अदानी यांना ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सने जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतूनही बाहेर काढले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये अदानी आता ११ व्या क्रमांकावर घसरले आहे. या अहवालानंतर गौतम अदानी यांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत अदानी समुहाला सुमारे 36.1 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. इतकंच नाही तर कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे अदानी समूहाला सुमारे 65 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे.

अदाणींच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण : अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. हा अहवाल 24 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध होताच अदानी समूहाच्या अनेक शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. अदानी समूहाच्या साम्राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर त्याच्या नेटवर्थवरही परिणाम झाला आहे. यानंतर अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चच्या 88 प्रश्नांना ४१३ पानांत उत्तरे दिली असून, बदनामी करण्यासाठी हा अहवाल समोर आणला असल्याचे सांगितले.

अदाणींकडे राहिली फक्त 'इतकी' संपत्ती : मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स इतक्या वेगाने घसरले की ते टॉप 10 च्या यादीतून बाहेर पडले आणि ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये 11 व्या स्थानावर गेले. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये अदानी आता ११ व्या क्रमांकावर दिसत आहे. त्यांची संपत्ती आता ८४.४ अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. या यादीत मुकेश अंबानी अदानी यांच्या मागे आहेत. त्यांची संपत्ती $82.2 अब्ज आहे

काय आहे संपूर्ण प्रकरण : हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या आठवड्यात 24 जानेवारी 2023 रोजी एका अहवालात दावा केला होता की, अदानी समूह अनेक दशकांपासून शेअर्स मॅनिपुलेशन आणि अकाउंट फ्रॉड करत आहे. मात्र, अदानी समूहाने हा अहवाल खोटा असल्याचे सांगत संपूर्ण अहवालाला आपल्या वतीने ४१३ पानांचे उत्तर दिले. अदानी यांनी तर याला खोटेपणाचे बंडल म्हटले आणि त्यांच्या कंपनीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे सांगितले. अदानी समुहाने हिंडेनबर्ग रिसर्चच्या 88 प्रश्नांची 413 पानांत उत्तरे दिली असून, आपली बदनामी करण्यासाठी हे सर्व जाणूनबुजून केले जात असल्याचे म्हटले आहे. 413 पानांच्या उत्तरात, अदानी समूहाने म्हटले आहे की हिंडेनबर्ग अहवाल अमेरिकन कंपनीला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी खोटी छाप निर्माण करण्याच्या गुप्त हेतूने प्रेरित आहे.

हिंडेनबर्गचा अहवाल निराधार : हिंडेनबर्ग रिसर्चने पसरवलेल्या आरोपांना निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या म्हणत अदानी समूहाने प्रत्युत्तर दिले आहे. हे उत्तर 400 पेक्षा जास्त पानांचे आहे. यावर अदानी यांनी संबंधित कागदपत्रांसह उत्तर दिले. अदानी समूहाचा प्रतिसाद हिंडनबर्गच्या 'गुप्त' हेतू आणि मोडस ऑपरेंडीच्या विरोधात देखील प्रश्न उपस्थित करतो, ज्याने भारतीय न्यायव्यवस्था आणि नियामक चौकटीला सोयीस्करपणे बायपास केले आहे.

हेही वाचा: Hindenburg Report On Adani हिंडेनबर्गच्या प्रश्नांना अदानींनी दिला राष्ट्रवादाचा मुलामा कळीच्या प्रश्नांवर निरुत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.