ETV Bharat / business

Hindenburg Research Adani : 10 दिवसांत तब्बल 52 अब्ज डॉलर्सचे नुकसान! अदानी समुहाची अशी झाली पडझड - अदानी एंटरप्रायझेस

हिंडेनबर्ग अहवालाने अदानींच्या साम्राज्याला हादरा बसला आहे. अदानी समूहाला अवघ्या 10 दिवसांत 52 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. याशिवाय हा अहवाल आल्यापासून आत्तापर्यंत अदानी समूहात बरीच उलथापालथ झाली आहे. टाइमलाइनद्वारे समजून घ्या आत्तापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम.

Hindenburg Research Adani
हिंडेनबर्ग अदानी समूह
author img

By

Published : Feb 5, 2023, 1:34 PM IST

नवी दिल्ली : गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर अमेरिकन संशोधन कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल आला आणि अदानींच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली. त्या दिवसापासून अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 50 टक्क्यांनी घसरले आहेत. या अहवालानंतर अदानी समूहाचे बाजार भांडवल 10 लाख कोटींनी कमी झाले आहे. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाचे मार्केट कॅप 19.2 लाख कोटी रुपये होते. मात्र अहवाल आल्यापासून बरंच काही घडलं आहे. हा संपूर्ण घटनाक्रम या टाइमलाइन मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

24-31 जानेवारी : अमेरिकन रिसर्च कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी अदानी समूहावरील आपला अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील फेरफार, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसारखे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, अदानी समूह या आरोपांचे सातत्याने खंडन करत असून समूह हिंडेनबर्गवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र एवढे करूनही अदानी एंटरप्रायझेसला गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकता आलेला नाही. अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

दोन दिवसांची घसरण 4 लाख कोटी ज्या दिवशी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाला त्या दिवशी अदानी समूहाच्या व्हॅल्युएशन मध्ये 85 टक्यांची घसरण झाली. दुसर्‍या दिवशी अदानी समूहाशी संबंधित संस्थांचे बाजार भांडवल सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी घसरले. अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चला उत्तर देत हा अहवाल निराधार असल्याचे सांगितले. तथापि हिंडेनबर्गने आपण आपल्या अहवालावर ठाम असल्याचे म्हटले. यानंतर अदानीचा शेअर घसरत राहिला. त्यामुळे शेअर्सच्या बाजार भांडवलात दोन दिवसांची घसरण 4 लाख कोटी रुपयांची झाली. अदानी एंटरप्रायझेसने बाजारातून पैसे उभे करण्यासाठी 20,000 कोटींचा एफपीओ आणण्याची घोषणा केली होती. अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओ मध्ये पहिल्या दिवशी 1 टक्के सबस्क्रिप्शन पाहिले गेले. यानंतर अबू धाबीच्या इंटरनॅशनल होल्डिंगने अदानीच्या समर्थनार्थ एफपीओमध्ये 400 दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले. अशाप्रकारे अदानी एंटरप्रायझेसचे एफपीओ 31 जानेवारीपर्यंत पूर्णपणे सबस्क्राइब झाले.

1-3 फेब्रुवारी : 1 फेब्रुवारी रोजी क्रेडिट सुईसच्या खाजगी बँकेने अदानी बाँडवरील मार्जिन कर्जे थांबवली. स्विस, जी कर्ज देणारी एक खाजगी बँकिंग शाखा आहे तिने अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई यांना विकल्या गेलेल्या नोटांसाठी शून्य कर्ज मूल्य सेट केले. त्याच दिवशी अदानी समूहाच्या शेअर्सला 86 अब्ज डॉलरचे नुकसान झाले. त्यामुळे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) याप्रकरणी चौकशी सुरू करणे भाग पडले. त्याच रात्री अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस एफपीओ रद्द करण्याची घोषणा केली. शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीचा परिणाम अदानींच्या नेटवर्थवर झाला. एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकल्या गेले.

2 फेब्रुवारी रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानी समूहाच्या कंपन्यांना 2.6 अब्ज डॉलर कर्ज दिल्याचे उघड झाले. एसबीआयच्या एक्सपोजरमध्ये त्यांच्या परदेशातील युनिट्समधून 200 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जांचा समावेश होता. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे धाकटे बंधू लॉर्ड जो जॉन्सन यांनी आता बंद पडलेल्या अदानी एंटरप्रायझेस एफपीओशी निगडीत यूकेस्थित गुंतवणूक फर्म एलारा कॅपिटलच्या गैर-कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला. तसेच गौतम अदानी यांचे मुंबईतील तीन मेगा प्रोजेक्ट चव्हाट्यावर आले आहेत.

3 फेब्रुवारी रोजी एस अ‍ॅंड पी ग्लोबल रेटिंगने अदानी पोर्ट्स आणि अदानी इलेक्ट्रिसिटीची रेटिंग स्थिर वरून नकारात्मक अशी केली. या दिवसापासून अदानी एंटरप्रायझेससह अदानी समूहाच्या तीन कंपन्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या अल्पकालीन अतिरिक्त देखरेख उपाय (ASM) फ्रेमवर्क अंतर्गत आल्या आहेत. एलआयसीने खुलासा केला की त्यांचा अदानी एंटरप्रायझेसमध्ये 4.23 टक्के, अदानी पोर्ट्समध्ये 9.14 टक्के आणि अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के हिस्सा आहे.

हेही वाचा : Nirmala Sitharaman on Adani Row: अदानी प्रकरणावर केंद्र सरकारने सोडले मौन.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'यंत्रणा..'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.