नवी दिल्ली: आर्थिक सुधारणा आणि करचोरी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे ( Economic Reform and Tax Evasion Remedy Scheme ) जुलैमध्ये जीएसटी संकलन 28 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटी रुपये झाले ( GST collection at Rs 1.49 lakh crore ) आहे. सरकारने सोमवारी ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन जुलै 2021 मध्ये 1,16,393 कोटी रुपये होते. वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर या वर्षी जुलैमध्ये मासिक कर संकलन दुसऱ्या क्रमांकाचे होते.
यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये, संकलनाने 1.68 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. समीक्षाधीन कालावधीत वस्तूंच्या आयातीतून मिळणाऱ्या महसुलात 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत 22 टक्क्यांनी जास्त होता.
हेही वाचा - Indian stock markets in green : भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या आठवड्यात तेजीत