ETV Bharat / business

Dhantrayodashi 2023 : धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? 'या' गोष्टींची घ्या काळजी

Dhantrayodashi 2023 : धनत्रयोदशीला सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. गुंतवणुकीचा हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण यात जोखीम फार कमी असते. तुम्ही देखील या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. वाचा..

gold
gold
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 4:12 PM IST

नवी दिल्ली Dhantrayodashi 2023 : सणांच्या काळात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. भारतात दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची प्रथा शतकानुशतकं सुरू आहे. अशा परिस्थितीत सोन्याची खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पुढील आठवड्यात धनत्रयोदशीचा सण आहे. तेव्हा जवळपास प्रत्येक घरात सोनं खरेदी केलं जाईल. मात्र या काळात अनेकांची फसवणुकही केली जाते. त्यामुळे सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घ्या.

  • शुद्धता : सोनं खरेदी करताना शुद्धतेला फार महत्त्व असतं. सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. २४ कॅरेट सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं. त्याची किंमतही अधिक असते. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा भेसळयुक्त सोनं विकून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ही खबरदारी घेणं आवश्यक आहे.
  • वजन आणि किंमत : सोन्याची किंमत त्याच्या वजनाच्या आधारावर ठरवली जाते. बाजारातील दरांमध्ये अनेकदा चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या नाण्यांचं वजन तपासा आणि त्याची किंमत मोजण्यासाठी सध्याच्या बाजार दराशी तुलना करा.
  • रिटर्न/एक्सचेंज पॉलिसी : ज्वेलर किंवा विक्रेत्याच्या रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसीबद्दल चौकशी करा. जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे सोनं परत करायचं असेल किंवा एक्सचेंज करायचं असेल तर त्यासाठीची धोरणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. तसेच खरेदीशी संबंधित सर्व पावत्या घेण्यास विसरू नका.
  • सर्टिफाइड सोनं : नेहमी 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'नं प्रमाणित केलेलं सर्टिफाइड सोनंचं खरेदी करा. याद्वारे सोन्याची गुणवत्ता कळते. यासह, तुम्हाला ते सोनं नंतर विकण्यात किंवा देवाणघेवाण करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
  • मेकिंग चार्ज : सोनं खरेदीसोबत तुम्हाला मेकिंग चार्ज देखील भरावा लागतो. अनेकदा ज्वेलर्स मेकिंग चार्जेस बदलत राहतात. अशा परिस्थितीत, मेकिंग चार्जेसबद्दल ज्वेलरकडून नक्की माहिती घ्या.
  • बजेट : सोनं खरेदी करण्यापूर्वी आधी बजेट ठरवा. तुमच्या आर्थिक परिस्थितीचं मूल्यांकन करा आणि आर्थिक उद्दिष्टांशी तडजोड न करता तुम्ही सोन्यावर किती खर्च करू शकता ते ठरवा. त्यानंतरच सोनं खरेदी करा.

हेही वाचा :

  1. LPG Cylinder Prices Increase :सणासुदीत केंद्र सरकारनं फोडला महागाईचा बॉम्ब, वाढले गॅस सिलिंडरचे दर
  2. Diwali bonus News: केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर, 'ही' पात्रता असणाऱ्यांना मिळणार लाभ
  3. Bank Holidays in November 2023 : नोव्हेंबरमध्ये बँकांना असतील एवढ्या सुट्या; जाणून घ्या तारखा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.