मुंबई - वाढत्या इंधनदरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी (Electronic Vehicles Purchase) करण्याचा नागरिकांनाच कल वाढला होता. मात्र, आता इलेक्ट्रिक वाहनांना आगीचा घटना, रशिया व युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) आणि चीनमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown in China) फटका आता वाहन विक्रीवर दिसू लागला आहे. राज्यात एप्रिल महिन्यात मार्चच्या तुलनेत ३० टक्क्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी घट झाली आहे. त्यामुळे वाहन निर्मिती कंपन्या अडचणीत सापडले आहे.
एप्रिल महिन्यात खरेदीत घट
गेल्या काही वर्षात सतत इंधनदरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या फटका बसला आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने महागाईची झळ सोसावी लागू नयेत म्हणून अनेकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. मात्र, रशिया व युक्रेन युद्धासह चीनमध्ये सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम वाहन उत्पादनावर झाला आहे. त्यात केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांचा अहवाल संबंधित कंपन्यांकडून मागवला आहे. तोपर्यंत नवी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करू नयेत, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यांचा परिणामी, इलेक्ट्रिक वाहन विक्रीवर होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात जानेवारी महिन्यात ५ हजार ७४७ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. त्यात फेब्रुवारीमध्ये ८ हजार २०८ आणि मार्चमध्ये १२ हजार २०१ वाहनांपर्यंत वाढ झाली होती. मात्र, गेल्या महिन्याभरात झालेल्या घडामोडींमुळे एप्रिल महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांचा खप ८ हजार १८७ इतका कमी झाला आहे.
हेही वाचा - २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पेट्रोल गाड्यांना अच्छे दिन
राज्यात पेट्रोलचे दर १२० रुपये प्रति लीटरवर पोहचले असले, तरी पेट्रोल गाड्यांच्या विक्रीत चांगली वाढ होताना दिसत आहे. गेले तीन महिने पेट्रोलवर धावणाऱ्या वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये पेट्रोलवर धावणाऱ्या १ लाख २४ हजार ६७० वाहनांची विक्री झाली होती. त्यात मार्चमध्ये १ लाख ३९ हजार ४९० आणि एप्रिलमध्ये १ लाख ४४ हजार ८४७ इतकी वाढ झाली आहे.
राज्यात ५२ हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहन
इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी देखील गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष म्हणजे २०२० आणि २०२१ हे वर्षे कोरोनामुळे सोडल्यास,तर २०१८ मध्ये राज्यात ६ हजार ३०० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती. तर २०२१ मध्ये राज्यात २९ हजार ८६० वाहन खरेदी करण्यात आले आहेत. म्हणजे २०१८ च्या तुलनेत २०२१ मध्ये २३ हजार ५६० वाहन नोंदणी राज्यातील आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहेत. सध्या राज्यात ५२ हजार ८२ इलेक्ट्रिक वाहन धावत आहेत.
हेही वाचा - देशात 2020 पर्यंत हायब्रीडसह 70 लाख इलेक्ट्रीक वाहन विक्रीचे सरकारचे उद्दिष्ट